
सध्या सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम भरल्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हे प्रकरण सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडले आहे. या गावात अवैध मुरुम उत्खनन सुरु असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. त्यानंतर तहसीलदार व तलाठी कारवाईसाठी गावात पोहोचले. करमाळा उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक अंजली कृष्णा आपल्या पथकासह तेथे दाखल झाल्या होता. त्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यामध्ये झालेला संवाद व्हायरल झाला आहे.

अंजली कृष्णा आपल्या पथकासह कारवाई करु लागल्या. तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन केला. दरम्यान, अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना चांगलाच दम दिला. दोघांच्या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अशात अंजली कृष्णा या कोण आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

अंजली कृष्णा या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पूर्ण नाव अंजना कृष्णा वी. एस आहे. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1997 साली झाली.

त्या केरळा तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील मलयंकीजू गावातील आहेत. त्यांचे वडील बीजू हे कपड्यांचा छोटासा व्यवसाय चालवतात.

अंजना कृष्णा यांची आई स्थानिय न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करत आहेत. त्या अगदी सामान्य कुटुंबातून आल्या आहेत.

अजंली कृष्णा यांचे प्राथमिक शिक्षण हे पूजप्पुरामधील सेंट मॅरीज सेंट्रल स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी नीरमंकरा येथील HNMSPB NSS कॉलेज फॉर वुमेनमध्ये अॅडमिशन घेतले.

बीएससी पदवी संपादन करुन अंजली या UPSC परीक्षेच्या तयारी लागल्या होत्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले आहे.

अंजली कृष्णा यांनी UPSC CSE 2022-23 मध्ये AIR-355 रँक मिळवत आयपीएस पद मिळवले आहे.