
अभिनेत्री जान्हवी कपूरचं रिलेशनशिप जगजाहीर आहे. कधी गळ्यात बॉयफ्रेंडच्या नावाचा नेकलेस घालून तर कधी त्याच्यासोबत तिरुपती बालाजींचं दर्शन घेऊन.. जान्हवीने अप्रत्यक्षपणे नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया कोण आहे, ते जाणून घेऊयात..

जान्हवीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तर शिखरच्या कुटुंबाचे राजकीय संबंध आहेत. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. तर तो स्वत: एक बिझनेसमन आहे. त्याचसोबत तो पोलोचा खेळाडूसुद्धा आहे.

शिखरचे वडील संजय पहारिया हेसुद्धा बिझनेसमन आहेत. शिखर आणि जान्हवीची पहिली भेट शाळेत झाली होती. शालेय जीवनापासूनच या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. परंतु 2018 मध्ये जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं होतं.

ब्रेकअपच्या चार वर्षांनंतर जान्हवी आणि शिखर पुन्हा एकत्र आले. 2022 मध्ये दोघांनी पॅचअप केलं आणि तेव्हापासून त्यांना नेहमीच एकत्र पाहिलं जातं. जान्हवीच्या कुटुंबीयांसोबत शिखरचं चांगलं नातं आहे, जान्हवीसुद्धा शिखरच्या कुटुंबीयांसोबत मिळून-मिसळून असते.

शिखरने लंडनमधल्या रीजेंट युनिव्हर्सिटीमधून ग्लोबल फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये पदवी संपादित केली. तो रॉयल जयपूर पोलो स्क्वॉडचाही भाग होता. 2013 मध्ये त्याने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.