कोण आहे अखिल अक्कीनेची पत्नी झैनब? श्रीमंतीत नागार्जुनलाही टाकेल पाठी

सुपरस्टार नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्कीनेनी नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. आता त्याची पत्नी नेमकी कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

| Updated on: Jun 10, 2025 | 1:01 PM
1 / 5
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता नागार्जुनचा धाकटा मुलगा अखिल अक्कीनेनी नुकताच लग्न बंधनात अडकला. त्याने झैनब रवदजीशी लग्न केले. पण झैनब आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

2 / 5
झैनब रवदजी एक व्यावसायिक कलाकार आहे, जी तिच्या प्रभावी पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे. २०१२ मध्ये तिने तिचा पहिला कला संग्रह, 'रिफ्लेक्शन्स', सादर केला होता. तेव्हापासून तिने हैदराबादमध्ये समकालीन प्रभाववादी कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

3 / 5
३९ वर्षीय झैनब एका श्रीमंत व्यावसायिक कुटुंबातून आहे. तिच्या कलाकृती आणि प्रदर्शनांनी तिला हैदराबादच्या कला विश्वात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

4 / 5
झैनब ही प्रसिद्ध उद्योगपती झुल्फी रवदजी यांची कन्या आहे, जे बांधकाम उद्योगातील अग्रणी आणि हैदराबादमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. तिचा भाऊ, झैन रवदजी कौटुंबिक व्यवसायाचा, ZR रिन्यूएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहे.

5 / 5
झैनबने अखिल अक्किनेनी, तेलुगू चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अक्किनेनी कुटुंबाचा सदस्यशी नुकतेच लग्न केले. हे लग्न अक्किनेनी कुटुंबाच्या लोकप्रियतेमुळे चर्चेचा विषय ठरले. अखिलचे वडील नागार्जुन आणि मोठा भाऊ नागा चैतन्य यांनी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत झैनबचे अक्किनेनी कुटुंबात हार्दिक स्वागत केले.