Hamza Zahoor : ज्यानं पडत्या काळात पाकिस्तानला सावरलं, शतक झळकावत भारताला हरवणारा हमजा जहूर नेमका कोण?
पाकिस्तानकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हमजा जहूरने तुफानी बॅटिंग केली. त्याने 108 चेंडूंचा सामना करत 92.59 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 100 धावा केल्या.

अंडर-19 आशिया कप 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (8 नोव्हेंबर) अल अमीरात येथे सामना झाला. भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 209 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानची अवस्था 61 धावांवर 5 विकेट अशी झाली असतानाही हमजा जहूरने नाबाद शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला. (फोटो सौजन्य- एक्स)
पाकिस्तानकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हमजा जहूरने तुफाी बॅटिंग केली. त्याने 108 चेंडूंचा सामना करत 92.59 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 100 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारताच्या हातातून विजय निसटला. त्यामुळे सध्या क्रिकेटविश्वात त्याच्या कामगिरीची चर्चा सुरू आहे. (फोटो सौजन्य- एक्स)
हमजा जहूरचा जन्म 3 नोव्हेंबर 2007 रोजी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सियालकोट येथे झाला. तो यष्टीरक्षकही आहे. पाकिस्तानच्या अंडर-19 संघाकडून तो खेळतो. भारताविरुद्धच्या शतकी खेळीमुळे त्याने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. (फोटो सौजन्य- एक्स)
हमजा जहूरने आतापर्यंत पाकिस्तानकडून एक फर्स्ट क्लास सामना खेळला आहे. या सामन्यात त्याला फलंदाजीची एकच संधी मिळाली होती. मात्र, या डावात त्याला खातेही उघडता आले नाही आणि तो शून्यावर बाद झाला होता. (फोटो सौजन्य- एक्स)
हमजा जहूरने पाकिस्तानकडून चार टी-20 सामने खेळले असून तीन डावांत 82 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 37 आहे. तो पाकिस्तानचा भविष्यातील स्टार क्रिकेटपटू ठरणार का, असे विचारले जात आहे. (फोटो सौजन्य- एक्स)