Who is Petal Gahlot : भारताच्या लेकीने पाकिस्तानची जगापुढे इज्जत काढली, पेटल गहलोत आहेत तरी कोण?

संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत भारताने पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाडला. यावेळी हे काम भारताच्या पटेल गहलोत यांनी केले आहे. त्या नेमक्या कोण आहेत, असे आता विचारले जात आहे.

| Updated on: Sep 27, 2025 | 4:26 PM
1 / 5
संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे. भारताने जागतिक मंचावर पाकिस्तानला नेहमीच उघडे पाडलेले आहे. यावेळी पुन्हा एकदा भारताची मुलगी पेटल गहलोत यांनी भारताची लक्तरं काढली आहेत.

2 / 5
पेटल गहलोत यांनी संयुक्त राष्ट्राच्या मंचावर बोलताना पाकिस्तान हा असा देश आहे, ज्याने ओसामा बिन लादेन यासारख्या कुख्यात दहशतवाद्याला एक दशकभर आसरा दिला, असे म्हणत पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला आहे. त्यामुळे आता पेटल गहलोत कोण आहेत? असे विचारले जात आहे.

3 / 5
संयुक्त राष्ट्रामध्ये भारताची बाजू ठामपणे मांडणाऱ्या पेटल गहलोत या भारताच्या राजनयिक अधिकारी आहेत. त्यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या पुन्हा दिल्लीत गेल्या.

4 / 5
2010 ते 2012 या काळात त्यांनी दिल्ली विद्यापीठातील लेडी श्रीराम कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण घतले. त्यानंतर त्यांनी 2018 ते 2020 या काळात अमेरिकेतील मोंटेरे येथे मिडिलबरी इन्स्टीट्यूटमधून लँगवेच इंटरप्रिटेनशन आणि ट्रान्सलेशनमध्ये पदव्यूत्तर पदवी घेतली.

5 / 5
त्यांनी सर्वात अगोदर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयात अंडर सेक्रेटरी म्हणून काम केले. त्यानंतर 2024 साली संयुक्त राष्ट्रामध्ये सल्लागार म्हणून काम केले.  त्यांना गिटार वाजवायला आवडते. त्या छंद म्हणून गायनही करतात. आपल्या क्षेत्रात समर्पणाने काम करून त्या भारताची बाजू लावून धरतात.