110 कोटींच्या VITS हॉटेलमध्ये शिरसाटांच्या मुलाला इंटरेस्ट? हॉटेलचा खरा मालक कोण?
संजय शिरसाट यांच्या मुलाने विट्स हॉटेल लिलावातून कमी किमतीत हॉटेल खरेदी केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या हॉटेलचा खरा मालक कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Sanjay SirsatImage Credit source: Tv9 Network
- सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेतून घेतल्याच्या आरोपावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
- छत्रपती संभाजीनगरातील विट्स हॉटेलची किंमत ११० कोटी रुपये असताना, ते केवळ ६७ कोटी रुपयांना संजय शिरसाट यांच्या मुलाने विकत घेतले, असा आरोप होत आहे. आता या हॉटेलचा खरा मालक कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
- सध्या चर्चेत असणारे विट्स हॉटेल हे रमेश हवेली यांच्या मालकीचे आहे.
- रमेश हवेली यांनी धनदा कॉर्पोरेशन नावाची कंपनी उभी केली होती. त्याचे शेअर्स विकले. शेअर्स होल्डरला परतावा देण्याचे ठरवलं. काही काळ परतावा दिला. त्या नंतर बँक करप्ट झाल्याचं सांगून परतावा देणे बंद केले
- शेअर्स होल्डर कडून यासंदर्भात विशेष न्यायालयात तक्रार झाली होती. शासनाने गॅझेट नोटिफिकेशन करून प्रॉपर्टी अटॅच केली. 2018 मध्ये एमपीआयडी ऍक्ट नुसार त्या भागातील एसडीएम यांची सक्षम अधिकारी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती हॉटेलची लिलाव करण्यासाठी होती.





