चिकन लेग पीस कोणी खाऊ नये? तुमच्यासाठी ठरेल सायलेंट किलर

बिर्याणीमधील चिकन लेग पीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की हानिकारक? हृदयरोग, मधुमेह आणि वजन वाढीचा त्रास असलेल्या लोकांनी लेग पीस का खाऊ नये, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.

| Updated on: Feb 11, 2026 | 4:20 PM
1 / 6
बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे रसरशीत चिकन लेग पीस. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या पीससाठी आग्रही असतो. मात्र, चवीला उत्तम लागणारा हा भाग तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो का, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे रसरशीत चिकन लेग पीस. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या पीससाठी आग्रही असतो. मात्र, चवीला उत्तम लागणारा हा भाग तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो का, याबद्दलची माहिती समोर आली आहे.

2 / 6

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चिकन लेग पीसमध्ये प्रथिने आणि सुमारे १२ प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे असली, तरी काही विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी तो सायलंट किलर ठरू शकतो.

3 / 6

चिकन लेग पीसमध्ये डार्क मीट असते. यामध्ये पांढऱ्या मांसाच्या तुलनेत चिकन ब्रेस्ट आणि चरबीचे (Fat) आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. यामुळे व्याधी असलेल्या व्यक्तींनी विचारपूर्वक सेवन करणे गरजेचे आहे.

4 / 6

लेग पीसमध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित तक्रारी आहेत, त्यांच्यासाठी हे घातक ठरू शकते.

5 / 6

जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा डाएट फॉलो करत आहेत, त्यांनी लेग पीस खाणे टाळावे. यातील अतिरिक्त कॅलरीजमुळे वजन वेगाने वाढण्याची शक्यता असते.

6 / 6

मधुमेही रुग्णांनी त्यांच्या आहारात चरबीयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. लेग पीसच्या अतिसेवनाने मेटाबॉलिझ्मवर परिणाम होऊन रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास अडथळे येऊ शकतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us