अंबानींच्या अँटेलिया बंगल्यात दररोज 4000 चपात्या कोणासाठी बनवल्या जातात?

Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्यात दररोज ४००० रोट्या का बनवल्या जातात, याबद्दलची रंजक माहिती जाणून घ्या.

| Updated on: Apr 24, 2026 | 1:10 PM
1 / 8
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या साध्या राहणीसाठी आणि शाकाहारी जेवणासाठी ओळखले जाते. मात्र, सध्या सोशल मीडियावर अंबानींच्या अँटेलिया निवासस्थानी दररोज तयार होणाऱ्या ४,००० चपात्यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या साध्या राहणीसाठी आणि शाकाहारी जेवणासाठी ओळखले जाते. मात्र, सध्या सोशल मीडियावर अंबानींच्या अँटेलिया निवासस्थानी दररोज तयार होणाऱ्या ४,००० चपात्यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

2 / 8

अंबानींच्या अँटेलिया निवासस्थानी इतक्या मोठ्या संख्येने चपात्या नक्की कोणासाठी बनवल्या जातात, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत.

3 / 8

अंबानी कुटुंबाचा आहार अत्यंत साधा असला तरी, त्यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. 'अँटेलिया'मध्ये सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, चालक, स्वयंपाकी आणि तांत्रिक मदनीस असे सुमारे ६०० कर्मचारी कार्यरत आहेत.

4 / 8

या सर्व कर्मचाऱ्यांना पौष्टिक आणि ताजे जेवण मिळावे, याची काळजी अंबानी कुटुंबाकडून घेतली जाते. याच कर्मचाऱ्यांच्या भोजनासाठी दररोज तब्बल ४,००० रोट्या तयार केल्या जातात.

5 / 8

कमी वेळेत हजारो रोट्या तयार करण्यासाठी अंबानींच्या किचनमध्ये अत्याधुनिक रोटी मेकर मशिन बसवण्यात आले आहे. हे मशिन काही मिनिटांत शेकडो रोट्या तयार करते. मात्र, रोट्यांची चव आणि दर्जा घरगुती राहावा, यासाठी एका विशेष शेफच्या टीमकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

6 / 8

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानींच्या घरात काम करणाऱ्या मुख्य शेफचा पगार एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओच्या तोडीचा आहे. एका रोटी शेफला दरमहा सुमारे २ लाख रुपये पगार दिला जातो, असे म्हटले जाते. यासोबतच कर्मचाऱ्यांना विमा आणि इतर शैक्षणिक सुविधाही पुरवल्या जातात.

7 / 8

अंबानी कुटुंब हे रात्री हलके आणि पचायला सोपे असे जेवण खातात. यासाठी ते नाचणी किंवा बाजरीची भाकरी, गुजराती स्टाईल भाज्या आणि सॅलड खाणे पसंत करतात.

8 / 8

अंबानी कुटुंब स्वतः जेवणात डाळ-भात, बाजरीची भाकरी आणि गुजराती पदार्थांना पसंती देते, पण आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आणि भोजनाची ते तितकीच तत्परतेने काळजी घेतात, हेच यावरून दिसून येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us