Tulsi puja : तुळशीची पूजा करताना पूजेत पान आणि सुपारीचा विडा का दिला जातो? जाणून घ्या

हिंदू धर्मात तुळशीचं विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाच्या दारात तुळशी वृंदावन दिसतं. रोज सकाळी तुळशीला पाणी अर्पण करून पूजा केली जाता. चला जाणून घेऊयात विडी अर्पण करण्याचं महत्त्व

| Updated on: Jun 07, 2025 | 9:39 PM
1 / 5
हिंदू मान्यतेनुसार, विड्याच्या पानात देवी देवतांचा वास असतो. पानाच्या वरच्या भागाद इंद्रदेव, मध्य भागात सरस्वती आणि खालच्या भागात देवी लक्ष्मीचा वास असतो. तर पानावर भगवान विष्णूंचा वास असतो. दुसरीकडे, सुपारीत सर्व देव देवतांचा वास असतो. यामुळे शुभ कार्यात सुपारीची पूजा केली जाते.

2 / 5
तुळशी मातेला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं. विड्याचं पान आणि सुपारी देवी लक्ष्मीला प्रिय आहे. तुळशीला अर्पण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येते.

3 / 5
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीमातेला पान आणि सुपारी अर्पण केल्याने भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात. देव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व अडचणी स्वतः दूर करतात. पान आणि सुपारी हे दोन्ही संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित मानले जातात.

4 / 5
सुपारी हे गौरी-गणेशाचे एक रूप देखील मानले जाते आणि ते तिजोरीत ठेवल्याने घरात लक्ष्मीचा कायमचा निवास होतो. यामुळे सौभाग्य आणि संपत्ती वाढते. देवी लक्ष्मीला विड्याच्या पानांचा हार अर्पण केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.

5 / 5
हिंदू धर्मातील सोळा संस्कार आणि विविध उपासनेत विड्याचे पान आणि सुपारीचे विशेष स्थान आहे. देवतांना 'तांबूल' म्हणून अर्पण केले जाते. सोळा उपायांपैकी एक आहे, ज्यामुळे पूजा पूर्ण मानली जाते. (Photo_TV9 Network)