कुत्रे गाडीच्या टायरवर लघवी का करतात? 99 टक्के तुम्हाला माहित नसेल कारण

कुत्रे गाडीच्या टायरवर लघुशंका करणं ही सवय अनेकांना ही साधी सवय वाटते. पण कुत्र्यांच्या या वागण्यामागे काही खास आणि महत्त्वाचे संकेत दडलेले असतात. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 04, 2025 | 4:13 PM
1 / 10
आपण रस्त्यातून जाता येताना अनेकदा पाहिले असेल की कुत्रे गाडीच्या टायरवर किंवा खांबांवर लघवी करतात. ते असं का करतात? असा प्रश्न अनेकदा आपल्याला पडतो.  अनेकदा आपल्याला त्यांच्या या सवयीमागचं कारण कळत नाही.

2 / 10
कुत्रे गाडीच्या टायरवर लघुशंका करणं ही सवय अनेकांना ही साधी सवय वाटते. पण कुत्र्यांच्या या वागण्यामागे काही खास आणि महत्त्वाचे संकेत दडलेले असतात. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

कुत्रे गाडीच्या टायरवर लघुशंका करणं ही सवय अनेकांना ही साधी सवय वाटते. पण कुत्र्यांच्या या वागण्यामागे काही खास आणि महत्त्वाचे संकेत दडलेले असतात. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

3 / 10
कुत्र्यांना आपली जागा किंवा क्षेत्र निश्चित करण्याची सवय असते. यासाठी ते लघवीचा वापर करतात. त्यामुळे ते लघवीचा वापर करुन इतर कुत्र्‍यांना त्यांच्या क्षेत्राबद्दल सांगत असतात.

4 / 10
कुत्रे ज्या गाड्यांवर लघवी करतात किंवा ज्या खांबावर लघवी करतात त्या भागात इतर कुत्रे जाणं टाळतात. लघवीमधून येणाऱ्या विशिष्ट वासामुळे इतर कुत्र्यांना त्या जागेवर आधीच कुणीतरी आहे हे कळते. त्यामुळे ते त्या ठिकाणी येणं टाळतात.

5 / 10
कुत्रे लघवीद्वारे एकमेकांना संदेश देत असतात. कुत्रे नेहमी अशाच ठिकाणी लघवी करतात जिथे तिचा वास जास्त काळ टिकून राहील. जर त्यांनी जमिनीवर लघवी केली, तर पाणी किंवा धुळीमुळे तो वास लवकरच नाहीसा होऊ शकतो.

6 / 10
पण, धातूचे खांब किंवा रबरी टायर यांसारख्या वस्तूंवर लघवीचा गंध अधिक काळ टिकून राहतो. याच कारणामुळे कुत्रे थेट जमिनीवर लघवी करण्याऐवजी अशा उभ्या आणि टिकाऊ गोष्टींवर लघवी करणे पसंत करतात.

7 / 10
कुत्र्यांची लघवी ही फक्त क्षेत्र चिन्हांकित करण्यासाठी नसते. कधीकधी हा त्यांच्या जोडीदारासाठी किंवा मित्रांसाठी पाठवलेला एक खास संदेश असतो. या वासातून ते एकमेकांना ओळखतात.

8 / 10
यामुळे कुत्र्यांना एकमेकांच्या आरोग्याची आणि मानसिक स्थितीची माहिती कळते. कधी कधी कुत्रे त्यांच्या भावनाही व्यक्त करतात. म्हणूनच कुत्र्यांसाठी लघवी फक्त एक नैसर्गिक क्रिया नसून त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे.

9 / 10
या सर्व कारणांमुळे कुत्रे टायर किंवा खांबावर लघवी करतात. त्यांच्या या सवयीमागे एक वैज्ञानिक आणि सामाजिक कारण दडलेलं असून यामुळे आपल्याला त्यांच्याशी अधिक चांगल्या प्रकारे जोडण्यास मदत होते.

10 / 10
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)