
पक्ष्यांचा थवा 'V' आकारात का असतो? या मागचं कारण वैज्ञानिकांनी शोधून काढलं आहे. V आकारात पक्ष्यांच्या कळपाला उडणं सोपं जातं. तसेच उडताना एकमेकांना धडकत नाहीत.

पक्ष्यांचा थवा 'V' आकारात उडत असल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाऱ्याचा वेग आरामात झेलू शकतात. सर्वात पुढे असलेला पक्षी हवेचा वेग तुलनेनं कमी करतो. त्यामुळे इतर पक्ष्यांना उडणं सोपं जातं.

प्रत्येक पक्ष्यांच्या थव्यात एक पक्षी नेतृत्व करतो. सर्वात पुढे असणाऱ्या पक्ष्याला पकडून V आकार केला जातो. उर्वरित पक्षी नेत्याच्या मागे एका ओळीत उडतात. जेव्हा एक पक्षी उडताना थकतो तेव्हा दुसरा पक्षी त्या गटाचे नेतृत्व करतो. असे केल्याने त्यांची ऊर्जा वाया जात नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

बहुतांश लोकांना असं वाटते की, पक्षी स्पर्धेपोटी अशा पद्धतीने उडतात. पण पक्षी V आकारात उडतात कारण त्यामुळे त्यांना हवेतून प्रवास करणं सोपे होते.पक्ष्यांची ऊर्जा वाया जाणार नाही याचीही खात्री होते.

बहुतेक स्थलांतरित पक्षी दीर्घ स्थलांतरात V आकारात उडतात. ऊर्जा वाचवण्यासाठी त्यांच्या थव्यातील संपर्क राखण्यासाठी आणि उड्डाणादरम्यान टक्कर टाळण्यासाठी असं करतात. ( सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नड)