
व्हिस्की पिण्याऱ्यांची संख्या भारतात अधिक आहे. जगभरात सर्वाधिक व्हिस्की पिण्याऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. रिसर्च प्लॅटफॉर्म स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, भारतात व्हिस्कीची प्रत्येक दुसरी बाटली विकली जाते. देशात प्रति व्यक्ती 2.6 लिटर व्हिस्की प्यायली जाते. भारतात सोडा टाकून व्हिस्की पिण्याची पद्धत रूढ झाली आहे. असं का आणि कशासाठी त्यामागचं कारण समजून घेऊयात. (Pic: Unsplash)

व्हिस्कीमध्ये 40 ते 50 टक्के अल्कोहोल असते. वाइन तज्ज्ञ सोनल हॉलंडच्या मते, व्हिस्की थेट पिणं कठीण जाते. त्यामुळे घशात जळजळ होते. सोडा जळजळ कमी करतो आणि थंड करतो. उन्हाळ्याच्या दिवसात व्हिस्कीत सोडा टाकून प्यायल्याने हलकं जातं. त्याची चव पिण्यायोग्य होते. (Pic: Unsplash)

वाइन एक्सपर्ट सोनल हॉलँड यांच्या मते, एक काळ असा होता की प्रिमियम व्हिस्कीच्या बाटल्या नव्हत्या. तेव्हा सोडा व्हिस्कीची चव बदलत असे. त्यामुळे ही पद्धत रूढ झाली. एका देशातून दुसऱ्या देशात गेली. आजही लोकं हा ट्रेंड फॉलो करतात. (Pic: Unsplash)

व्हिस्कीत अनेक प्रकरची एरोमॅटिक कम्पाउंड्स असतात. सोडा किंवा पाणी टाकल्याने त्याचा फ्लेवर रिलीज होतो. दुसरं म्हणजे व्हिस्कीत सोडा टाकून प्यायल्याने त्याचा नशा हळूहळू चढतो. हँगओव्हर वेगाने होत नाही. (Pic: Unsplash)

सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिस्की थेट प्यायल्यास पोटाला इजा पोहोचवू शकते. यामुळे एसिडिटी आणि जळजळ वाढण्याची शक्यता अधिक असते. सोडा ते सौम्य करते. थेट प्यायल्यास नाक आणि जीभेचे रिसेप्टर्स सुन्न पडतात. इतकंच काय तर यकृताला हानी पोहोचू शकते. त्यामुळे सोडा घालून प्यायले जाते. महत्त्वाचं म्हणजे, अल्कोहोल कोणत्याही स्वरुपात हानिकारक आहे हे पण तितकंच खरं. (Pic: Unsplash)