Onions : कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येतं ? यामागचं कारण माहित्ये का ?

कांदा हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाच्या भाज्यांपैकी एक आहे. अनेक पदार्थांना कांद्याशिवाय हवी तशी चवच येत नाही. मात्र, कांदा चिरायला घेतला की डोळ्यांतून पाणी येण्याचा अनुभव जवळपास प्रत्येकालाच आला असेल. पण असं नेमकं का होतं? यामागे कोणतं वैज्ञानिक कारण आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

| Updated on: Oct 05, 2026 | 4:31 PM
1 / 5
कांदा... किचनमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या भाज्यांपैकी हीदेखील एक आहे. मात्र, कांदा कापताना आपल्या डोळ्यांतून पाणी येतं. कांदा कापताना त्याच्या पेशींना इजा होते. कांद्याच्या पेशींमध्ये सल्फरयुक्त संयुगे आणि काही विशिष्ट एन्झाइम्स असतात. कांदा अखंड असताना हे घटक वेगवेगळे राहतात. पण आपण चाकूने कांदा चिरतो तेव्हा पेशी फुटतात आणि हे घटक एकमेकांच्या संपर्कात येतात.

कांदा... किचनमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या भाज्यांपैकी हीदेखील एक आहे. मात्र, कांदा कापताना आपल्या डोळ्यांतून पाणी येतं. कांदा कापताना त्याच्या पेशींना इजा होते. कांद्याच्या पेशींमध्ये सल्फरयुक्त संयुगे आणि काही विशिष्ट एन्झाइम्स असतात. कांदा अखंड असताना हे घटक वेगवेगळे राहतात. पण आपण चाकूने कांदा चिरतो तेव्हा पेशी फुटतात आणि हे घटक एकमेकांच्या संपर्कात येतात.

2 / 5

यातून एका तीव्र रसायनाची निर्मिती होते, ज्याला लॅक्रिमेटरी फॅक्टर म्हणतात. हा पदार्थ हवेत मिसळून आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो. डोळ्यांच्या संपर्कात येताच जळजळ आणि चुरचुर सुरू होते. आपले डोळे अतिशय संवेदनशील असल्यामुळे ते या रसायनाला त्रासदायक पदार्थ म्हणून ओळखतात. त्यानंतर डोळ्यांतील अश्रूग्रंथी सक्रिय होतात आणि मोठ्या प्रमाणात अश्रू तयार करतात. हे अश्रू डोळ्यांपासून त्रासदायक रसायन दूर करण्याचं काम करतात. त्यामुळेच कांदा चिरताना आपल्या डोळ्यांतून पाणी येतं.

3 / 5

विशेष म्हणजे, ही प्रक्रिया कांद्याच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेचा एक भाग असल्याचं वैज्ञानिक मानतात. कांदा कीटक आणि इतर जीवांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अशा रसायनांची निर्मिती करतो. त्यामुळे कांद्याला नुकसान करणाऱ्या जीवांना त्यापासून दूर ठेवण्यास मदत होते.

4 / 5

मात्र, कांदा कापताना काही टिप्स वापरल्या तर डोळ्यांतून येणारे अश्रू काही प्रमाणात कमी करता येऊ शकतात. यासाठी कांदा कापण्याच्या 10 ते 15 मिनिटे आधी तो फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर कांदा बाहेर काढून कापा. कांदा थंड असताना त्यातून निर्माण होणाऱ्या वायूचे प्रमाण कमी होते.

5 / 5

आणखी एक उपाय म्हणजे कांदा पाण्यात भिजवून मग तो चिरणे. कांद्यातून बाहेर पडणारा वायू पाण्यात विरघळल्यामुळे त्याचा डोळ्यांवर होणारा परिणाम काही प्रमाणात कमी होतो. म्हणूनच, पुढच्या वेळी कांदा कापताना डोळ्यांतून पाणी आलं, तर फक्त कांद्याला दोष देऊ नका ! त्यामागे हे रंजक वैज्ञानिक कारण आहे, हे लक्षात ठेवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us