महिला कमरेखाली सोन्याचे दागिने का घालत नाही? 99 टक्के तुम्हाला माहिती नसेल कारण

भारतीय संस्कृतीत महिला कमरेखाली सोन्याचे दागिने घालत नाहीत, कारण सोन्याला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्याचा आदर राखण्यासाठी व समृद्धी टिकवण्यासाठी ही परंपरा पाळली जाते.

| Updated on: Dec 16, 2025 | 6:18 PM
1 / 10
भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये दागिन्यांना फार महत्त्व आहे. दागिने हा प्रत्येक महिलेचा वीक पॉईंट मानला जातो. दागिने हे केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नव्हे तर ते वापरण्यामागे धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कारणेही असतात.

2 / 10
आपण अनेकदा पाहिलं असेल की महिलांच्या पायात चांदीचे पैंजण, जोडवी किंवा कंबरेला चांदीचा छल्ला असतो. पण कोणतीही महिला कंबरेच्या खाली सोन्याचे दागिने परिधान करत नाही. आज आपण यामागे दडलेले शास्त्र जाणून घेणार आहोत.

3 / 10
महिला कंबरेच्या खाली सोन्याचे दागिने न घालण्यामागे अनेक शतके जुन्या श्रद्धा आणि समजुती कारणीभूत आहेत. ही केवळ एक प्रथा नसून, भारतीय परंपरेत सोन्याला दिलेल्या विशेष आदरामुळे ही गोष्ट पाळली जाते.

4 / 10
भारतीय संस्कृतीत, सोन्याला अत्यंत शुभ आणि पवित्र धातू मानले जाते. सोन्याला धन, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. यामुळे सोन्याचा वापर संपत्ती आणि सौभाग्य टिकवून ठेवण्यासाठी केला जातो. अनेक धार्मिक विधींमध्ये सोन्याचा वापर केला जातो आणि त्याला देव-देवतांच्या आसनाशी जोडले जाते.

5 / 10
यामुळे, सोन्यासारखा पवित्र धातू शरीराच्या खालच्या भागात म्हणजेच कमरेखाली पायात परिधान करणे हे त्याचा अपमान मानले जाते. या श्रद्धेनुसार, जर लक्ष्मीचे प्रतीक असलेले सोने पायात घातले तर लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते, असेही म्हटले जाते.

6 / 10
सोन्याला पवित्र मानले जात असले तरी महिला पायात चांदीचे पैंजण मोठ्या प्रमाणात घालतात  सोन्याप्रमाणे चांदी देखील शुभ मानली जाते, परंतु धार्मिक दृष्ट्या सोन्यापेक्षा तिचा दर्जा कमी असतो. त्यामुळे चांदी पायात घालण्यास कोणतीही धार्मिक अडचण नसते.

7 / 10
काही तज्ज्ञांनुसार, चांदी हा धातू शरीराला थंडावा देतो, तर सोने उष्णता वाढवते. पायांमध्ये चांदीचा वापर केल्याने शरीराचे तापमान संतुलित राखण्यास मदत होते, अशीही एक पारंपरिक समजूत आहे.

8 / 10
एकंदरीत, महिला कंबरेच्या खाली सोन्याचे दागिने न घालण्यामागे मुख्य कारण म्हणजे सोन्याला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानून त्याला दिलेला उच्च आदर आहे. ही परंपरा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, जी आजही मोठ्या प्रमाणात पाळली जाते.

9 / 10
या प्रथेमागे कोणताही वैज्ञानिक किंवा कायदेशीर आधार नाही. ती पूर्णपणे धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा आणि मूल्यांवर आधारित आहे. सोन्याचा मान जपण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी टिकावी यासाठी महिला याचे पालन करतात.

10 / 10
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)