AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलने इराणवर हल्ला करताच पाकिस्तानला भरली धडकी, झरदारींनी भारताचं नाव घेत जे सांगितलं…

दक्षिण आशियातील वाढत्या धोरणात्मक तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी एक मोठं केलं आहे. भारत या प्रदेशात नवीन युद्धाची तयारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाकिस्तान यापुढे सीमापार दहशतवादी हल्ले सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

इस्रायलने इराणवर हल्ला करताच पाकिस्तानला भरली धडकी, झरदारींनी भारताचं नाव घेत जे सांगितलं…
आसिफ अली झरदारी
| Updated on: Mar 03, 2026 | 8:50 AM
Share

जगात सध्या युद्धाचे ढग दिसत आहेत. अमेरिका – इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याला त्यांच्याकडून चोख प्रत्युत्तर मिळत आहे. मध्य पूर्वेतील या युद्धाचा फटका सर्वांनाच बसतानादिसत आहे. इराणने विविध देशातील अमेरिकी सैन्याच्या ळावरही हल्ला चढवला. सर्वत्र तणावाचे वातावरण असून त्यातच आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी एक मोठा दावा केला आहे. भारत आणखी एका युद्धाची तयारी करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय नेते उघडपणे युद्धाबद्दल बोलत आहेत. पण प्रादेशिक शांततेचे नेहमीच समर्थक असल्यामुळे मी या मार्गाची शिफारस करणार नाही असं त्यांनी नमूद केलं.

भारतासाठी शांततेचा संदेश

पाकिस्तान भारतासोबत सार्थक आणि शांततापूर्ण चर्चेसाठी तयार आहे आणि युद्धापेक्षा प्रादेशिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संवाद हा एकमेव मार्ग आहे, असेही झरदारी म्हणाले. ‘भारताला माझा संदेश आहे की युद्धाच्या वातावरणातून बाहेर पडून अर्थपूर्ण चर्चेसाठी टेबलावर बसा, कारण हाच प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेचा मार्ग आहे.’ असं त्यांनी सांगितलं. दक्षिण आशियातील सुरक्षा परिस्थितीवरून वाढलेल्या तणावाच्या वेळी झरदारी यांचं हे विधान आलं आहे. सोमवारी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना, विरोधकांच्या गदारोळात, झरदारी यांनी अफगाणिस्तानबद्दलही एक विधान केलं.

अफगाणिस्तानबाबत कठोर भूमिका

अफगाण सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांवरही झरदारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोहा कराराच्या अटींचे पालन न केल्याचा आरोप त्यांनी अफगाण नेतृत्वावर केला. झरदारी यांच्या मते, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बीएलए सारख्या दहशतवादी गटांना अफगाण भूमीतून पाठिंबा मिळत आहे. पाकिस्तानचा संयम संपला आहे आणि कोणत्याही बाह्य किंवा देशांतर्गत शक्तीला पाकिस्तानची शांतता भंग करू दिली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.

इराणवरील हल्ल्याचा केला निषेध

पाकिस्तानी राष्ट्रपतींनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवायांचा निषेध केला. एवढंच नव्हे तर त्यांनी इराणच्या सार्वभौमत्वाला पाठिंबा दर्शविला आणि अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. दरम्यान, इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येनंतर झालेल्या हिंसक निदर्शनांना प्रतिसाद म्हणून पाकिस्तानव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कार्दूमध्ये तीन दिवसांचा संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरही संघर्ष सुरूच आहे.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.