AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khamenei: खामेनेई यांच्या उजव्या हाताचं मोठं रहस्य… 45 वर्ष का ठेवला लपवून… सवय होती की घातपात!

Khamenei: खामेनेई यांच्या निधनानंतर इराणमध्ये खळबळ माजली आहे... निधनानंतर त्यांच्याबद्दल अनेक रहस्य समोर येत आहेत... खामेनेई कायम स्वतःचा उजवा हात लपवून ठेवायचे... तब्बल 45 वर्ष त्यांनी उजवा हात समोर आणला नाही... तर ही त्यांची सवय होती की, कोणता घातपात होता याबद्दल जाणून घ्या सविस्तर...

Khamenei: खामेनेई यांच्या उजव्या हाताचं मोठं रहस्य... 45 वर्ष का ठेवला लपवून... सवय होती की घातपात!
Khamenei
| Updated on: Mar 03, 2026 | 8:36 AM
Share

Khamenei: अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खामेनेई ठार झाले आहेत. यामुळे इराणची जनता रस्त्यावर उतरली आहे. गेल्या काही दशकांमध्ये इस्रायल आणि अमेरिकेने इराणी लक्ष्यांवर केलेला हा सर्वात मोठा हल्ला होता अशी माहिती समोर आली आणि रविवारी सकाळी याची पुष्टी झाली. तुम्ही खामेनेई यांना अनेक फोटो आणि व्हिडीओमध्ये पाहिलं असेल की, ते त्यांचा उजवा हात कधीच दाखवत नव्हते. ते कायम स्वतःचा उजवा हात लपवून ठेवायचे… सांगायचं झालं तर, काही वर्षांपूर्वी, सर्वोच्च नेते खामेनेई यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला. ज्यामध्ये त्यांचे प्राण तर वाचले, पण त्यांचा उजवा हात जखमी झाला.

27 जून 1981 रोजी ते इराण-इराक युद्धाच्या मोर्चावरून परतले आणि एका मशिदीत नमाज पठण करण्यासाठी गेले. नमाजानंतर, त्यांनी लोकांशी संवाद साधला आणि प्रश्नांची उत्तरे दिली तेव्हा एका संशयास्पद व्यक्तीने त्यांच्यासमोर टेप रेकॉर्डर ठेवला. जवळपास 1 मिनिटं त्या टेप रेकॉर्डरमधून शिट्टीसारखा आवाज येत आहे होता आणि त्यानंतर, मोठा स्फोट झाला.

त्यानंतर एक पत्र मिळालं, ज्यामध्ये लिहिलं होतं, “फुरकान ग्रुपकडून इस्लामिक रिपब्लिकला भेट,” ही संघटना त्यावेळच्या धार्मिक राजवटीचा कट्टर विरोधक मानली जात होती.’ स्फोटात जखमी झाल्यानंतर खामेनेई यांनी देखील यावर मोठं वक्तव्य केलं होतं. ‘मला हाताची गरज नाही, माझे विचार आणि माझी जीभ काम करते…’, असं ते म्हणाले होते.

उजवा हात जखमी झाल्यानंतर खामेनेई यांनी डाव्या हाताने लिहिण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. हल्ल्यानंतरही त्यांची राजकीय कारकीर्द थांबली नाही आणि ते हळूहळू धार्मिक नेतृत्वाच्या अंतर्गत वर्तुळात सामील झाले. त्यानंतर 1989 मध्ये Ruhollah Khomeini यांच्या निधनानंतर ते देशाचे सर्वोच्च नेते बनले, हे पद त्यांनी जवळजवळ 35 वर्षे भूषवले.

वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत त्यांनी इराणच्या राजकीय आणि धार्मिक व्यवस्थेवर मजबूत पकड ठेवली. आंतरराष्ट्रीय रिपोर्टनुसार, त्यांना जगातील सर्वात जास्त काळ सत्तेवर राहिलेल्या नेत्यांपैकी एक मानले जात असे.

इराण आणि इस्रायल यांच्यातील लष्करी संघर्ष

28 फेब्रुवारी 2026 पासून अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील लष्करी तळ, क्षेपणास्त्र केंद्रे आणि अण्वस्त्र प्रकल्पांना टार्गेट केले. इराणनेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलसह आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या युद्धामुळे इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...