
तुमची चूक फक्त तुमची चूक आहे. तुमचे अपयश तुमचेच अपयश आहे. त्याबद्दल इतर कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा.

महाविद्यालयीन शिक्षणातून पाच आकड्यातून मिळणाऱ्या पगाराचा विचार करु नका. एका रात्रीतून कोणी यशस्वी होत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि श्रम करावे लागतात.

चित्रपट किंवा टीव्हीवर दाखवण्यात येणारे जीवन खरे जीवन नाही. जीवन चित्रपट किंवा एखाद्या धारावाहीकप्रमाणे नाही. प्रत्यक्ष जीवनात आराम नसतो. काम आणि फक्त काम असते.

मी योग्य निर्णय घेण्यात विश्वास करत नाही. मी निर्णय घेतो आणि ते निर्णय योग्य सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत करतो. दुसऱ्यांवर दगड फेकण्याऐवजी त्या दगडांचा वापर करुन महल तयार करा.

तुम्ही वेगाने चालत असला तर एकटे चला. पण लांबपर्यंत जायाचे असेल तर इतरांना सोबत घ्या. तुमच्या जीवनात सत्ता आणि धन हे कधी दोन सिद्धांत प्रमुख ठेऊ नका.

आपल्या सर्वांमध्ये एकसमान कलागुण नाहीत. परंतु आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याच्या समान संधी असतात.