
चहा आणि बिस्किटाचा इतिहास हा ब्रिटिशांची निगडित आहे. ब्रिटनमध्ये चहासोबत हलका नाष्टा करण्यासाठी बिस्कीट खाल्ले जाते. चहा अगोदर चीनमधून ब्रिटनमध्ये आला. त्यानंतर ब्रिटनमध्ये चहासोबत बिस्कीट खाण्याची परंपरा चालू झाली. भारत आणि ब्रिटनमध्ये चहासोबत बिस्कीट देण्याची परंपरा खूप वर्षांपासून चालू आहे.

चहासोबत नेहमी बिस्कीटच का खाल्ले जातात? असा प्रश्न अनेकांना पडतो. तसं पाहायचं झालं तर बिस्कीट आणि लाडू हे दोन्ही खाद्यपदार्थ गोड असतात. पण चहासोबत कधीच लाडू खायला दिला जात नाही. चहासोबत फक्त बिस्कीटच दिले जातात. यामागे एक खास कारण आहे.

चहामध्ये जेव्हा बिस्कीट बुडवले जाते. तेव्हा ते लगेच नरम पडते. बिस्किटामध्ये असलेले ग्लुटीन आणि स्टार्च लगेच नरम पडते. त्यामुळे ते खायला सोपे होते. बिस्किटामधील नरपणा आणि चहामधील गोडवा हा हवा-हवासा वाटतो. त्यामुळेच चहासोबत बिस्कीट खाल्ले जाते. बिस्कीट चहामध्ये न बुडवताही अगदी कमी वेळात खाता येऊ शकते.

चहामध्ये फक्ति बिस्कीटच का खाल्ले जाते. बिस्किटाऐवजी लाडू का खाल्ला जात नाही, ते जाणून घेऊ या. खरं म्हणजे लाडू हे बिस्किटाच्या तुलनेत जास्त गोड असतात. त्यामुळेच चहासोबत लाडू खाल्ला जात नाही. यासह लाडू चहामध्ये विरघळत नाही. लाडूच्या तुलनेत बिस्कीट हे कुठेही उपलब्ध असतात. कमी वेळात ते खाताही येतात. म्हणूनच चहासोबत लाडू खायला दिले जात नाहीत.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)