
तुम्ही तुमच्या आजूबाजूला कार, ट्रक, दुचाकीचे चाक पाहिले असेल. चाकाचा रंग नेमही काळाच असतो. चाकाचा रंग नेहमी काळाच का असतो असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? यामागे मोठं वैज्ञानिक कारण आहे.

सुरुवातीला वाहनांचे चाक हे काळ्या रंगाच नव्हते. टायरची निर्मिती करताना कंपन्यात त्यात कार्बन ब्लॅक नावाचा घटक मिळतात. त्यामुळेच टायरांचा रंग काळा होतो.

कार्बन ब्लॅकमुळे चाक मजबूत, टिकाऊ आणि अधिक सुरक्षित होतात. कार्बन ब्लॅकमुळे टायरमध्ये उष्णता शोषून घेण्याची क्षमता निर्माण होते. चाकांमध्ये कार्बन ब्लॅक हा घटक मिसळला नाही, तर चाक लवकर घासते.

त्यामुळे टायर लवकर पुटण्याची शक्यता निर्माण होते. कार्बन ब्लॅक सूर्यापासून येणाऱ्या यूव्ही रेजपासूनही चाकाला वाचवते. त्यामुळेच चाकांचा रंग नेमही काळाच असतो.

रबरामध्ये कार्बन ब्लॅक हा घटक मिसळल्यावर चाक दीर्घकाळ टिकते. तसेच चाक लवचिकही होण्यास मदत मिळते. त्यामुळेच चाकांचा रंग नेहमी काळा असतो.