तुम्हाला बेडजवळ औषध ठेवण्याची सवय आहे का? लगेचच बदला जागा, कारण…

झोपताना डोक्याजवळ औषधे ठेवल्याने तुमच्या आरोग्यावर आणि वास्तूवर काय परिणाम होतात? जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार औषधे ठेवण्याची योग्य दिशा आणि त्यामागील शास्त्रीय कारणे.

| Updated on: Dec 17, 2025 | 4:09 PM
1 / 8
हल्ली धकाधकीच्या जीवनात अनेक जण कोणत्या ना कोणत्या आजारासाठी नियमित औषधे घेत असतो. रात्री झोपताना औषधे शोधायला लागू नयेत म्हणून ती उशाशी किंवा बेडच्या बाजूला असलेल्या टेबलावर ठेवली जातात.

2 / 8
आपल्याला ही सवय अतिशय सोयीची वाटत असली, तरी वास्तू आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने ती तुमच्या आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी अडथळा ठरू शकते.

3 / 8
वास्तू शास्त्रानुसार, आपण जिथे झोपतो ती जागा नेहमी शांतता आणि आरामाची असणं गरजेचे असते. औषधे ही मुळात आजारपणाचे प्रतीक असतात. जर तुम्ही तुमच्या डोक्याजवळ औषधे ठेवली, तर त्यातून सतत नकारात्मक विचार बाहेर पडत असतात. याचा परिणाम तुमच्या विचारांवर होतो आणि तुम्हाला शांत झोप लागत नाही.

4 / 8
औषधे डोक्याजवळ ठेवल्याने त्या आजाराची ऊर्जा तुमच्या शरीराभोवती सतत रेंगाळत राहते. परिणामी, औषधे घेऊनही आजार लवकर बरा होत नाही किंवा तो पुन्हा पुन्हा उद्भवतो.

5 / 8
ज्योतिषशास्त्रानुसार, औषधांचा संबंध राहू ग्रहाशी असतो. तर झोप आणि मन यांचा संबंध चंद्रासोबत असतो. जेव्हा तुम्ही औषधे उशाशी ठेवता, तेव्हा चंद्रावर राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे मन अस्वस्थ होते.

6 / 8
तसेच कारणाशिवाय भीती वाटणे किंवा रात्री भयानक स्वप्ने पडणे अशा तक्रारी सुरू होतात. यामुळे मानसिक तणाव वाढतो आणि व्यक्तीला सतत चिडचिड जाणवू लागते.

7 / 8
वास्तू तज्ज्ञांच्या मते, औषधे उघड्यावर किंवा बेडजवळ ठेवल्याने घरातील आजारपण कधीच बाहेर जात नाही. यामुळे कुटुंबातील सदस्यांवर औषधांचा खर्च वाढत राहतो. ही स्थिती टाळण्यासाठी औषधे नेहमी दृष्टीआड म्हणजेच कपाटात ठेवावीत.

8 / 8
औषधे ठेवण्यासाठी घराची किंवा रुमची आग्नेय दिशा उत्तम मानली जाते. औषधे कधीही उघड्यावर ठेवू नका. ती एका बॉक्समध्ये किंवा ड्रॉव्हरमध्ये बंद करून ठेवा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात कधीही औषधे ठेवू नका, कारण ही देवस्थानची जागा मानली जाते. तसेच ज्या औषधांची तारीख संपली आहेत. ती त्वरित घरातून बाहेर काढा. अशी औषधे घरात ठेवणे वास्तुदोष निर्माण होतो.