Home Loan : पत्नी की आई-वडील? ज्वॉईंट होम लोनसाठी पार्टनर कोण? तुमचा फायदा कशात

Joint Home Loan : संयुक्त गृहकर्जासाठी बँका दोन व्यक्तीचे उत्पन्न जोडून कर्ज किती देता येईल याची चाचपणी करते. संयुक्त कर्जाचा सर्वात मोठा फायदा हप्त्यावर पडतो. EMI दोन व्यक्तींमध्ये विभाजीत होतो. एका व्यक्तीवर बोजा पडत नाही.

| Updated on: Aug 20, 2025 | 1:04 PM
1 / 6
स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. घर खरेदीसाठी तर कधी कधी सर्व कमाई डावावर लावली जाते. तरीही घराचे स्वप्न दूर असते. मग पैसे जमावण्यासाठी बँक अथवा खासगी पतसंस्था, खासगी बँकांकडे लोक धाव घेतात. गृहकर्ज हे इतर कर्जांच्या तुलनेत सर्वाधिक काळ चालते. कर्ज चुकवण्यासाठी 15-20-30 वर्ष निघून जातात. जर तुमची कमाई, उत्पन्न जास्त नसेल तर संयुक्त गृहकर्जाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

2 / 6
घर खरेदीसाठी बँक कमाल 80 टक्क्यांपर्यंत गृहकर्ज देतात. पण तुम्ही कुटुंबात कुणासोबत गृहकर्ज घेतात त्यावर ते अवलंबून असते. घर खरेदी करताना पती-पत्नी वा आई-वडील यांच्यापैकी कोणासोबत मिळून संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करावा? काय होतो फायदा?

3 / 6
संयुक्त गृहकर्जासाठी बँका दोन व्यक्तीचे उत्पन्न जोडून कर्ज किती देता येईल याची चाचपणी करते. संयुक्त कर्जाचा सर्वात मोठा फायदा हप्त्यावर पडतो. EMI दोन व्यक्तींमध्ये विभाजीत होतो. एका व्यक्तीवर बोजा पडत नाही.

4 / 6
संयुक्त गृहकर्जाचा सर्वात मोठा फायदा तुमच्या ईएमआयवर पडतो. कारण ईएमआय विभाजीत होतो. त्याचा कोणा एकाच्या पगारावर भार पडत नाही. तुमच्या हातात पैसा खेळता राहतो.

5 / 6
संयुक्त गृहकर्जामुळे क्रेडिट स्कोअर वाढतो. जर मालमत्तेवर दोघांचे नाव असेल तर दोघांना कर सूट, सवलतीसाठी दावा करता येतो. संयुक्त गृहकर्ज लवकर मंजूर होते. कारण यामध्ये दोन्ही अर्जदार एकमेकांसाठीचे हमीदार असतात.

6 / 6
जर पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर त्यांनी संयुक्त गृहकर्ज फायद्याचे ठरते. जर पत्नी गृहिणी असेल तर मग आई-वडील जे नोकरी करत असतील, त्यांच्यासह संयुक्त गृह कर्ज घेणे फायद्याचे ठरते. अर्थात घर कुणाच्या नावे असावे यावर निर्णय होऊ शकतो.