
क्रिकेटप्रेमींच्या मनात वर्ल्ड कप विषयी अनेक प्रश्न आहेत. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे वर्ल्ड कप आधी 60 ओव्हरचा होता मग त 50 ओव्हरचा कधी झाला? कुणी केला? कुठल्या साली झाला?

नेहमीप्रमाणे भारतीय संघ आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांना खुश करतोय. वर्ल्ड कपमध्ये पहिले चार सामने जिंकून भारताची धुमधडाक्यात सुरुवात झालीये.

तुमच्या मनातही वर्ल्ड कपविषयी अनेक प्रश्न असतील. वर्ल्ड कपचा इतिहास खूप रंजक आहे. वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचनंतर ते आत्तापर्यंत वर्ल्ड कपच्या नियमांमध्ये खूप बदल करण्यात आलेत.

या नियमांमध्ये अनेक नियमांचा समावेश होता. तुम्हाला माहितेय का की पूर्वी वनडे क्रिकेट आणि वर्ल्ड कपमध्ये 60 ओव्हरची मॅच व्हायची. 1987 सालच्या आधी वर्ल्ड कप 60 ओव्हरचा असायचा. पण 1987 पासून हा नियम बदलण्यात आला आणि 60 ऐवजी वर्ल्ड कप मॅच 50 ओव्हरची करण्यात आली.

1983 साली भारताला वर्ल्ड कप मिळाला त्यावर्षी कपिल देव कॅप्टन होते. ही वर्ल्ड कपची मॅच 60 ओव्हरची होती. विश्वचषक जिंकताना भारत 60 ओव्हरची मॅच जिंकला होता. भारत असा पहिला देश आहे ज्याने 60 ओव्हर, 50 ओव्हर आणि 20 ओव्हर वर्ल्ड कप जिंकण्याचा किताब आपल्या नावावर केलाय.