
आज 3 डिसेंबर रोजी 'जागतिक अपंग दिन' साजरा केला जातो. समाजिक प्रगतीसाठी अपंगत्व समावेशक समाजांना प्रोत्साहन देणे हे या दिनाचे खास उद्दिष्ट असते. याच दिवशी महाराष्ट्राचे शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांनी हमरशूट पॅरामोटर उड्डाण केले आहे.

जागतिक अपंग दिनाच्या औचित्याने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शिवशाहीर आणि प्रेरणादायी वक्ते डॉ.विजय तनपुरे यांनी लोणावळ्यातील ऍम्बी व्हॅली एअरपोर्टवरून तब्बल 3 हजार फूट उंचीवर हमरशूट पॅरामोटार उड्डाण करत धाडसी विक्रम नोंदवलाय. या विक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

डॉ.विजय तनपुरे यांच्या या ऐतिहासिक उड्डाणाचं नियोजन आणि मार्गदर्शन उद्योजक कॅप्टन विजय सेठी यांनी केल होत. दोन विजय एकत्र आले आणि हा विजय घडला हा संदेश या उपक्रमातून साकार झालाय.

या ऐतिहासिक उड्डाणानंतर डॉ. तनपुरे यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “माझा विजय आकाशात दिसतोय आणि विजय सेठी यांचा विजय माझ्या मनात आहे.” सध्या सर्वत्र तनपुरे यांनी केलेल्या विक्रमाची चर्चा सुरु आहे.

1993 मध्ये डॉ. तनपुरे यांच्या पहिल्या पोवाडा कॅसेटचे प्रकाशन झाले होते. या पोवाड्याचे प्रकाशन करणारेही विजय सेठीच होते. आज दोघांनी मिळून पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. त्यांच्या या इतिहासाची आणि धाडसाने विक्रम नोंदवला आहे.