
भारतात सोनं खरेदी करणं सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे अनेकजण ज्या ठिकाणी सोन्याची किंमत कमी आहे, अशा ठिकाणाहून सोनं खरेदी करण्याला प्राधान्य देत आहे.

आपल्यापैकी अनेकांना दुबई, सौदी अरेबिया, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी सोनं स्वस्त आहे, याबद्दल माहिती आहे. पण तुम्हाला माहितीये का? जगात असा एक देश आहे, ज्या देशात सोन्याचे घबाड दडलं आहे.

सोन्याचे घबाड दडलेल्या या देशाचे नाव घाना असे आहे. हा देश पृथ्वीचा मध्यबिंदू म्हणून ओळखला जातो. घाना हा देश जगाच्या अगदी मधोमध आहे, असे म्हटलं जातं.

संशोधनानुसार, पृथ्वीचा भौगोलिक केंद्रबिंदू आफ्रिका खंडातील घाना या देशाच्या सर्वात जवळ आहे. म्हणूनच घानाला पृथ्वीच्या भौगोलिक मध्यवर्ती देशांपैकी एक मानले जाते.

घाना हा पश्चिम आफ्रिकेतील एक महत्त्वाचा देश आहे. तो अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर स्थित असून, भौगोलिकदृष्ट्या पृथ्वीच्या मध्यवर्ती भागाच्या अगदी जवळ आहे.

विशेष म्हणजे, ग्रीनविच मेरिडियन (०° रेखांश) आणि विषुववृत्त (Equator) या दोन्ही महत्त्वाच्या रेषांच्या जवळ हा देश असल्यामुळे त्याचे स्थान आणखीनच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. यामुळेच या देशातील भौगोलिक परिस्थिती इतर ठिकाणांपेक्षा वेगळी आहे.

घाना हा देश केवळ भौगोलिक स्थानामुळेच नव्हे, तर त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि निसर्ग संपत्तीसाठीही ओळखला जातो.

हा देश सोन्याच्या खाणींसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, ज्यामुळे या देशाला 'गोल्ड कोस्ट' असेही म्हटले जाते.