एक किलो चहाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये, काय आहे वैशिष्ट्ये?
आपल्यापैकी जवळपास सर्वांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. अनेकांना चहामुळे ऊर्जा मिळते. प्रत्येकजण दिवसातून 2-3 वेळेस चहा पितो. पण जगातला सर्वात महागडा चहा कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत माहिती जाणून घेऊयात.
जगातील सर्वात महागडा दा होंग पाओ हा चहा चीनच्या फुजियान प्रांतातील वुई पर्वतरांगेत पिकवला जातो. चिनी शासक हा चहा पीत असत. याची पावडर पारंपारिक पद्धतीने तयार केली जाते.
-
-
आज आपण जगातील सर्वात महाग चहाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या चहाची किंमत इतकी आहे की, एक किलो चहाच्या किमतीत तुम्ही एक आलिशान घर, गाडी खरेदी करु शकता.
-
-
जगातील सर्वात महागडा चहा 9 कोटी रुपये किलो आहे. दा होंग पाओ असे या चहाचे नाव आहे. हा चहा आपला अनोखी चव, सुगंध, आणि औषधी गुणांसाठी ओळखला जातो.
-
-
जगातील सर्वात महागडा दा होंग पाओ हा चहा चीनच्या फुजियान प्रांतातील वुई पर्वतरांगेत पिकवला जातो. चिनी शासक हा चहा पीत असत. याची पावडर पारंपारिक पद्धतीने तयार केली जाते.
-
-
दा होंग पाओ या चहाला त्याच्या विशेष गुणवत्तेमुळे,’टी चॅम्पियन’ असे म्हणतात. या चहामध्ये तणाव कमी करणारे घटक, अँटीऑक्सिडंट्स असतात, तसेच याची चव उत्कृष्ट असते.
-
-
चीनच्या वुई पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या दा होंग पाओ या चहाची झुडुपे खूप मर्यादित आहेत. त्यामुळे चिनी सरकारने या झुडुपांना संरक्षित झुडुपे म्हणून घोषित केले आहे.