गवतासारखी दिसणारी ही भाजी 1 लाख रूपये किलो, 99 टक्के शेतकऱ्यांना माहितीच नाही

Most Expensive Vegetable : जगात अशी एक भाजी आहे जी फक्त श्रीमंत लोकांच्या ताटात दिसते. कारण ही भाजी प्रचंड दुर्मिळ आहे. तसेच ती पौष्टिकही आहे, त्यामुळे ती अक्षरशः सोन्याच्या भावाने विकली जाते. या जगातील सर्वात महाग भाजीची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: May 06, 2026 | 6:45 PM
1 / 5
जगातील सर्वात महाग भाजीचे नाव हॉप शूट्स आहे. या भाजीती किंमत हजारो रुपयांत नसून, 1 किलो हॉप शूट्ससाठी सुमारे 1 लाख रूपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. त्यामुळेच ही एक लक्झरी वस्तू बनली आहे.

2 / 5
ही भाजी साधी गवतासारखी दिसते, पण तिची खरी किंमत तिच्या गुणधर्मांमध्ये आहे. हॉप शूट्स इतकी महाग असण्यामागे तिची दुर्मिळता आणि मेहनतीची शेती हे मुख्य कारण आहे. या वनस्पतीला पूर्ण वाढ होण्यासाठी जवळपास 3 वर्षे लागतात आणि तिची कापणी करण्याचा काळही फारच मर्यादित असतो.

3 / 5
हॉप शूट्सची लागवड मुख्यतः जर्मनी, ब्रिटनसारख्या युरोपीय देशांमध्ये केली जाते. याशिवाय उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्येही तिची शेती होते. भारतातही हिमाचल प्रदेशात तिची लागवड करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो फारसा यशस्वी ठरला नाही.

4 / 5
या भाजीच्या फुलांना ‘हॉप कोन्स’ म्हणतात, जे बिअर बनवण्यासाठी वापरले जातात आणि यामुळे बिअरला खास कडवट चव व सुगंध मिळतो. तर तिच्या कोवळ्या काड्या भाजी म्हणून खाल्ल्या जातात आणि त्यांची चव थोडी तिखटसर असते.

5 / 5
लोक ही भाजी सलाडमध्ये कच्ची खाणे किंवा तिचे लोणचे बनवणे पसंत करतात. काही परदेशी रेस्टॉरंटमध्ये ती हलक्या आचेवर भाजून साइड डिश म्हणून दिली जाते. ही भाजी फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर तिच्या खास सुगंध आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे. ही भाजी  मानसिक ताण, निद्रानाश कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

Follow Us