40 मजली टॉवर, समुद्राचं अप्रतिम दृश्य अन्… वरळीतील नव्या बीडीडीचे फोटो पाहून व्हाल थक्क

वरळीच्या बहुप्रतिक्षित बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ५५६ नवीन घरे तयार झाली असून, आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लाभार्थ्यांना लवकर चाव्या देण्याची मागणी केली आहे.

| Updated on: Jul 30, 2025 | 12:39 PM
1 / 8
वरळी बहुप्रतिक्षित बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. या फेज १ अंतर्गत ५५६ घरं पूर्ण तयार झाली आहेत.

2 / 8
आता या बीडीडी चाळ प्रकल्पासंदर्भात वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी बीडीडीमधील रहिवाशांना लवकरात लवकर चाव्यांचे वितरण करावे, अशी मागणी केली आहे.

3 / 8
नुकतंच आदित्य ठाकरेंनी बीडीडीतील सर्व घरांची पाहणी केली. या पाहणीवेळी त्यांनी बीडीडीवासियांच्या नव्या घराचे फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत.

4 / 8
यात ४० मजल्याचा उच्चभ्रू टॉवर पाहायला मिळत आहे. या टॉवरमधील सर्व घरं ही ५०० चौरस मीटर अशी आहेत.  त्यासोबतच बीडीडीतील लोकांना त्यांच्या घरातून मुंबईच्या समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळणार आहे.

5 / 8
नवीन बीडीडीच्या इमारतींच्या नेमप्लेटचा फोटोहो ही समोर आला आहे. यात सर्वच्या सर्व नावं मराठी असल्याचे पाहायला मिळत आहे.

6 / 8
बीडीडी चाळ प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

7 / 8
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या फेज १ अंतर्गत ५५६ घरं पूर्ण तयार आहेत. त्यामुळे या घरांच्या चाव्यांचे लवकरात लवकर वितरण व्हावे, असे लाभार्थ्यांना वाटते, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले आहे.

8 / 8
येणारा गणेशोत्सव त्यांना नव्या घरात साजरा करायचा आहे. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून लाभार्थी हे भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर नवीन घराच्या चाव्या दिल्या जाव्या अशी मागणी आदित्य ठाकरेंनी सरकारला दिली आहे.