काही मिनिटांसाठी कोट्यवधी रुपये.. पती निर्माता तरीही धुरंधर २साठी यामी गौतमने घेतली इतकी फी
धुरंधर 2 चित्रपटातील कमी स्क्रीन टाईमसाठी कोट्यवधी रुपये घेतल्यामुळे यामी गौतम सध्या खूप चर्चेत आहे. आता तिने किती मानधन घेतलं चला जाणून घेऊया...

गेल्या काही दिवसांपासून धुरंधर 2 हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आदित्य धर दिग्दर्शित रणवीर सिंग, संजय दत्त, यामी गौतम यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का यामी गौतम चित्रपटात केवळ काही सेकंदासाठी दिसली. यामीचा पती या चित्रपटाचा आदित्य दिग्दर्शक असून तिने काही सेकंदाच्या रोलसाठी कोट्यवधी रुपये घेतले.

तुम्हाला माहिती आहे का की, धुरंधर २ मध्ये फक्त काही मिनिटांच्या छोट्या रोलसाठी यामी गौतमला किती मोठी रक्कम मिळाली? माहिती नसेल तर ही बातमी तुम्हाला हैराण करेल. फिल्ममध्ये नर्सच्या छोट्या किरदारात दिसणाऱ्या यामी गौतमवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव करण्यात आला आहे. पांढऱ्या युनिफॉर्ममध्ये जेव्हा ती स्क्रीनवर एंट्री करते, तेव्हा थिएटरमधील प्रत्येक प्रेक्षक हैराण होतो.

रणवीर सिंगचा हा ब्लॉकबस्टर सिनेमा अजूनही कमाईच्या बाबतीत अव्वळ स्थानावर आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट बक्कळ कमाई करताना दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नर्सची भूमिका साकारण्यासाठी यामी गौतमने निर्मात्यांकडून जवळपास 8 कोटी रुपये घेतले आहेत. एवढ्या छोट्या भूमिकेसाठी ही रक्कम खूप मोठी आहे असे म्हटले जात आहे.

कमी स्क्रीन टाईमसाठी इतके पैसे घेतल्यामुळे यामी गौतम सध्या खूप चर्चेत आहे. मोठ्या-मोठ्या हिरोइन्स एखादा पूर्ण सिनेमा करूनही इतके पैसे घेत नाहीत. तरीही यामीवर ही मेहरबानी का झाली, हे कोणालाही समजत नाही असे नाही. यामी गौतमने नर्सच्या भूमिकेत खूपच शानदार अभिनय केला होता.

१५०० कोटींच्या जवळ पोहोचलेल्या या सिनेमाला तयार करण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. धुरंधर रिलीज झाल्यावर इतका धमाका केला की, लोक म्हणत होते की धुरंधर २ पहिल्या दिवसापासूनच छप्पर फाड कमाई करेल आणि तसेच झाले. रणवीर सिंगच्या करिअरमधील हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांनीही सांगितले आहे की, रणवीरने आपल्या करिअरमधील सर्वात उत्तम परफॉर्मन्स दिला आहे.