
'जीव माझा गुंतला' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले विभक्त झाल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या दोघांनी सोशल मीडियावरून लग्नाचे फोटो डिलिट केले आहेत. त्याचप्रमाणे एकमेकांना अनफॉलो केलंय.

'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया गुरवच्या संसारातही काही आलबेल नसल्याचं समजतंय. अक्षयाने आठ वर्षांपूर्वी भूषण वाणीशी लग्न केलं होतं. या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं असून लग्नाचे फोटो काढून टाकले आहेत.

अभिनेता सुयश टिळकने 2021 मध्ये आयुषी भावेशी लग्न केलं होतं. या दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चा होत असून त्यांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. घटस्फोटाबाबत अद्याप त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

17 वर्षांच्या संसारानंतर गायक राहुल देशपांडे हे पत्नी नेहापासून विभक्त झाले. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. परंतु त्याची घोषणा त्यांनी सप्टेंबर 2025 मध्ये केली. या दोघांना रेणुका नावाची मुलगी आहे.

‘संगीत देवबाभळी’ या नाट्यसंगीतातून रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचाही घटस्फोट झाला आहे. संगीतकार आनंद ओक यांच्याशी तिने लग्न केलं होतं. काही वर्षांपूर्वीच आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, असं त्यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं.