कोल्हापूरची रणरागिणी! छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांवर तरुणीची धावमोहीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नोंद झालेल्या 12 किल्यांवर आसमा कुरणे या शिवप्रेमी तरुणीने धावमोहीम राबवली आहे. युनेस्कोच्या यादीत नोंद झालेले 12 किल्ले आसमा 3 हजार 470 किलोमीटर अंतर धावून पुर्ण करणारं आहे.

| Updated on: Feb 11, 2026 | 1:59 PM
1 / 6
कोल्हापूर पासून सुरवात केल्यानंतर आसमा कुरणे हिने रायगडसह 5 किल्ले पूर्ण केले आहेत. आता आसमा धावत वरंध घाट मार्गाने पुण्याच्या भोरमध्ये दाखल झाली आहे.  भोरमध्ये दाखल झाल्यानंतर शिवतीर्थ चौपाटी येथे शिवाजी महारांच्या पुतळ्याला शिवप्रेमींसह तीने अभिवादन केलं

कोल्हापूर पासून सुरवात केल्यानंतर आसमा कुरणे हिने रायगडसह 5 किल्ले पूर्ण केले आहेत. आता आसमा धावत वरंध घाट मार्गाने पुण्याच्या भोरमध्ये दाखल झाली आहे. भोरमध्ये दाखल झाल्यानंतर शिवतीर्थ चौपाटी येथे शिवाजी महारांच्या पुतळ्याला शिवप्रेमींसह तीने अभिवादन केलं

2 / 6

मूळची कोल्हापूरच्या असणाऱ्या आसमाला, या प्रवासादरम्यान सर्व ठिकाणी प्रशासनाकडूनही तिची निवास, भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे.. तसेच तिच्या सोबत आरोग्य विभागाची रुग्णवाहीका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

3 / 6

धावपटू आसमा हिने 13 जानेवारीला कोल्हापूर येथून सुरु केलेल्या धावत 12 गड किल्ल्यांवर पोहोचण्याच्या उपक्रमात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, प्रतापगड आणि रायगड किल्ले पुर्ण केले असून भोर वरंधा घाटमार्गे हिर्डोशी येथे मुक्कामी पोहचली.

4 / 6

दरम्यान, भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात, तहसिलदार राजेंद्र नजन यांच्याकडून तिचे अभिनंदन आणि स्वागत करण्यात आलं. भोर प्रशासनाकडून तिची निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

5 / 6

राजगडानंतर लोहगड,19 फेब्रुवारीला शिवनेरी, खांदेरी, साल्हेर, जिंजी (तामिळनाडू) आणि शेवटी पन्हाळा येथे सांगता होणार आहे..या उपक्रमासाठी एकूण 60 दिवसाचा अवधी लागणार असून 3 हजार 470 किलोमीटर अंतर धावून ती पुर्ण करणार आहे....

6 / 6

"युनेस्कोच्या जागतिक दर्जा प्राप्त झालेल्या किल्ल्यांच्या जनजागृती मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांची शिकवण युवा पिढीपर्यंत पोहोचवणे तसेच पर्यटनाला चालना मिळून पर्यटकांमार्फत इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल..., असं आसमा कुरणे म्हणाली आहे...

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us