
असुरक्षित सोशल मीडिया अकाउंटमुळे हॅकिंग, डेटा चोरी किंवा गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. पण हा धोका तुम्ही कमी करु शकता. पण त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करण्याची गरज आहे.

अद्वितीय पासवर्ड हे तुमचे सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी पहिलं पाऊल आहे. तुम्ही नेहमी टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू ठवा. शिवाय अकाउंटच्या सेटिंग्ज नियमितपणे तपासा...

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लॉगिंग तपशील कधीही कोणासोबत देखील शेअर करु नका... आणि वारंवार बदलू देखील नका... पासवर्ड देखील कोणासोबत शेअर करु नका...

सर्वजनिक वाय - फायवर सोशल मीडिया अकाउंट्स वापरणं केव्हाही टाळा. यामुळे तुमची खासगी माहिती लीक होण्याचा धोका अधिक असतो. तुमचे ऍप्स आणि ब्राउझर कायम अपडेट ठेवा...

सोशल मीडियावर अकाउंट म्हणजे फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हट्सऍप, ट्विटर... यांसारख्या सोशल मीडिया माध्यामांवरून तुमचा माहिती लीक होऊ शकते... त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या..