
क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा युवराज सिंग आता व्यवसायात उतरला आहे. त्याने भारतात त्याचा अल्ट्रा-प्रीमियम टकीला ब्रँड "फिनो" अधिकृतपणे लाँच केला आहे.

गुरुग्राममधील कोका येथे झालेल्या या कार्यक्रमात सुरेश रैना, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद कैफ सारखे दिग्गज खेळाडू उपस्थित होते. या सर्वांनी युवराजला नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.

हा ब्रँड युवराज सिंगने अनेक भारतीय-अमेरिकन उद्योजकांच्या साथीने सुरू केला आहे. फिनो टकीला त्याच्या शुद्धतेमुळे ओळखला जातो. हे पेय 100% ब्लू वेबर अॅगेव्हपासून बनवले जाते.

भारतात या ब्रँडचे नेतृत्व आयशा गुप्तू करत आहेत. सध्या, हा ब्रँड दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडक रिटेल आउटलेटवर उपलब्ध आहे. तसेच दिल्ली, अहमदाबाद आणि मुंबई येथील ड्युटी-फ्री स्टोअर्समधून देखील खरेदी करता येतो.

फिनोने चार वेगवेगळे प्रकार लाँच केले आहेत, प्रत्येकाची किंमत हजारोंच्या घरात आहे. भारतीय लोकांचा सरासरी पगार 25 ते 32 हजारांपर्यंत आहे. आता फिनोची एक बाटली खरेदी करण्यासाठी लोकांना एका महिन्याच्या पगार खर्च करावा लागू शकतो.