सुजय विखेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपमधील प्रवेश हा काँग्रेससाठी जबर धक्का मानला जात असून, भाजपने विरोधी पक्षनेत्याच्या घरातच खिंडार पाडली आहे. सुजय विखेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे मोदी […]

सुजय विखेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Follow us on

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपमधील प्रवेश हा काँग्रेससाठी जबर धक्का मानला जात असून, भाजपने विरोधी पक्षनेत्याच्या घरातच खिंडार पाडली आहे.

सुजय विखेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

  1. मोदी साहेब, शाह साहेब आणि फडणवीस साहेब यांचे आभार, कारण त्यांनी मला कार्यकर्ता म्हणून संधी दिली – सुजय विखे पाटील
  2. मला भाजपमध्ये प्रवेश दिला त्याबदल्ल सर्व नेत्यांचे आभार – सुजय विखे पाटील
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय पाहता, मोदींच्या प्रभावातून माझ्यासह युवकांनी भाजपमध्ये प्रवेश – सुजय विखे पाटील
  4. माझ्या वडिलांच्या विरुद्ध निर्णय घ्यावा लागलाय, त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे – सुजय विखे पाटील
  5. नगरमधील दोन्ही खासदार युतीचे असतील, असा शब्द देतो – सुजय विखे पाटील
  6. मुख्यमंत्र्यांनी मला प्रचंड आदर दिला, वडिलांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन मी भाजप प्रवेश केला. – सुजय विखे पाटील
  7. मुख्यमंत्र्यांनी मला त्यांच्या म
  8. नगरमध्ये भाजप वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन. नगरमधील जागा युतीच्या असतील.- सुजय विखे पाटील
  9. भाजपचा विजय असो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजय असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो – सुजय विखे पाटील
  10. माझ्या कार्यकर्त्यांना सुजय विखे पाटील यांच्या नावाच्या घोषणा करण्याची सवय आहे, भाजपच्या घोषणा द्यायला वेळ लागेल – सुजय विखे पाटील

सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखे पाटीलही हजर होत्या.

मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबमध्ये सुजय विखे पाटलांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडला. ‘एकच वादा, सुजय दादा’ अशा घोषणा देत गरवारे क्लब सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. नगरमधून मोठ्या संख्येत सुजय विखेंचे समर्थक या सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.