Rajya Sabha Election: जिवात जीव! 12 अपक्ष आमदारांची आघाडीच्या बैठकीला उपस्थिती; सपा, एमआयएम, बविआची दांडी

| Updated on: Jun 07, 2022 | 8:45 PM

Rajya Sabha Election: या बैठकीला समाजवादी पार्टी, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि एमआयएमचे आमदार उपस्थित नव्हते. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Rajya Sabha Election: जिवात जीव! 12 अपक्ष आमदारांची आघाडीच्या बैठकीला उपस्थिती; सपा, एमआयएम, बविआची दांडी
जिवात जीव! 11 अपक्ष आमदारांची आघाडीच्या बैठकीला उपस्थित; सपा, एमआयएम, बविआची दांडी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची (mahavikas aghadi) बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये सुरू आहे. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे ((shivsena) सर्व आमदार उपस्थित आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे 12 आमदार उपस्थित आहेत. त्यामुळे आघाडीच्या जिवात जीव आला आहे. तर बहुजन विकास आघाडी, एमआयएम आणि समाजवादी पार्टीचे आमदार या बैठकीला न आल्याने आघाडीचं टेन्शन अजून कायम आहे. या बैठकीत आमदारांना राज्यसभेसाठी मतदान कसं करायचं याबाबतची माहिती दिली जाणार आहे. तसेच कोणत्या प्रकारच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहनही यावेली आमदारांना केलं जाणार आहे. या शिवया काही सूचनाही केल्या जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोणत्या अपक्ष आमदारांची हजेरी?

महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी 12 अपक्ष आमदारांनी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यापैकी किशोर जोगेवार, देवेंद्र भुयार, संजय शिंदे, गीता जैन, मंजुळा गावित आणि आशिष जैस्वाल आदी 12 अपक्ष आमदारांनी बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे आघाडीने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

हे सुद्धा वाचा

एमआयएम आणि सपाची दांडी

या बैठकीला समाजवादी पार्टी, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी आणि एमआयएमचे आमदार उपस्थित नव्हते. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आघाडीने आमच्याकडे यावं, पाठिंबा मागावा, आम्ही पाठिंबा देऊ असं ओवैसी यांनी म्हटलं होतं. पण आघाडीचा कोणताही प्रतिनिधी एमआयएमकडे गेला नाही. त्यामुळे एमआयएमने या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. तर समाजवादी पार्टीने आघाडीला तात्त्विक मुद्द्यावर घेरलं आहे. हे सरकार धर्मनिरपेक्ष आहे की हिंदुत्ववादी हे स्पष्ट करावं अशी मागणी करत समाजवादी पार्टीने आघाडीकडे आपल्या मागण्यांचं पत्रं दिलं आहे. या मुद्द्यांवर सरकारने खुलासा केल्यावरच आघाडीला पाठिंबा देण्याचा विचार होईल, असं सपाने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनीही या बैठकीला दांडी मारली आहे.

या 12 अपक्ष आमदारांची उपस्थिती

गीता जैन
देवेंद्र भुयार
मंजुळा गावित
आशिष जयस्वाल
किशोर जोरगेवार
नरेंद्र भोंडकर
श्यामसुंदर शिंदे
संजय मामा शिंदे
चंद्रकांत पाटील (जळगाव)
विनोद निकोले
विनोद अग्रवाल
राजकुमार पटेल

बविआने सस्पेन्स वाढवला

बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी आम्हाला बैठकीचं आमंत्रणच नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बैठकीचं निमंत्रण नसल्याने आम्ही बैठकीला गेलो नाही. कदाचित आघाडीची खासगी बैठक असेल, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे. मात्र, 10 जून रोजीच मतदानाचा निर्णय घेणार असल्याचं सांगून ठाकूर यांनी सस्पेन्स वाढवला आहे.