महाज्योतीच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी 20 हजार मुलांना प्रशिक्षण, वडेट्टीवारांची माहिती

| Updated on: Jan 30, 2021 | 9:48 AM

महाज्योतीच्या माध्यमातून या वर्षी 20 हजार मुलांना प्रशिक्षण देणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. | Vijay wadettiwar

महाज्योतीच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी 20 हजार मुलांना प्रशिक्षण, वडेट्टीवारांची माहिती
vijay wadettiwar
Follow us on

नागपूर : राज्य सरकार भटक्या विमुक्त बांधवांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ओळख नसलेल्यांना मुख्य प्रवाहात आणणार असल्याचा निर्धार व्यक्त करत महाज्योतीच्या माध्यमातून या वर्षी 20 हजार मुलांना प्रशिक्षण देणार असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे. (20 Thousand Youth will be trained through Mahajyoti this year Says Vijay wadettiwar)

भटक्या विमुक्त समाजातील मुलांना जेईई, नीट परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार आहे तसंच 10 हजार मुलांना पोलीस नोकरीसाठी प्रशिक्षण देणार असल्याचंही वडेट्टीवर यांनी सांगितलं. या सगळ्याचा OBC,VJNT,SBC, भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

भटक्या विमुक्त जातीतील मुलांचं प्रशासनातील प्रमाण अतिशय कमी आहे. याचाच विचार करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणून एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांसाठीची तयारी त्यांच्याकडून करुन घेणार आहे. त्यासाठी आम्ही 500 मुलांची निवड करणार आहोत. त्यासाठीचा सगळा खर्च राज्य शासन करणार आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

महाज्योतीच्या माध्यमातून 20 हजार मुलांना प्रशिक्षण

बार्टी आणि सारथीच्या धर्तीवर महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी मागास प्रवर्गातील 20 हजार मुला-मुलींना सरकार प्रशिक्षण देणार आहे. महाज्योतीच्या जहिराती आता सुरु झाल्या आहेत. यंदाच्या वर्षी 20 हजार मुला-मुलींना प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण विविध क्षेत्रांसाठी देण्यात येईल. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुलांना रोजगार उपलब्ध होतील, अशी पावलं आम्ही उचलत आहोत. भटक्या विमुक्तांसाठी जे जे करता येईल ते ते आम्ही सगळं करु, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

पालामध्ये राहणाऱ्या भटक्या समाजातील लोकांचा राज्य सरकार सर्व्हे करणार

वर्षानुवर्षे गरिबीत दिवस काढत असलेल्या तसंच पालामध्ये राहणाऱ्या भटक्या समाजातील लोकांचा राज्य सरकार सर्व्हे करणार असल्याची माहिती मंत्री वडेट्टीवार यांनी दिली. तसंच ज्यांना स्वत:ची जन्मतारीख माहिती नाही, त्यांच्याकडे त्यांची कागदपत्रे नाही, अशा लोकांचा शोध घेऊन त्यांना सरकार मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

20 Thousand Youth will be trained through Mahajyoti this year Says Vijay wadettiwar

हे ही वाचा :

मंत्री वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक