AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी खासदार, शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळांनी प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण केली? गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

सदर घटनेचे आज नागपुरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. नागपूर येथे विधिमंडळावर मोर्चा नेण्याचा निर्णय संतप्त कर्मचारी वर्गाने घेतला आहे.

माजी खासदार, शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळांनी प्रशासकीय अधिकाऱ्याला मारहाण केली? गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
Image Credit source: social media
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 22, 2022 | 9:39 AM
Share

मुंबईः माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि त्यांच्या साथीदारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात मरीन लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये (Police Station) तक्रार दाखल करण्यात आली होती. मंत्रालय परिसरात आकाशवाणी आमदार निवास येथे मंगळवारी रात्री अडसूळ आणि त्यांच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यावर हल्ला झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

दी महाराष्ट्र मंत्रालय को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद चव्हाण यांचादेखील गळा आवळण्याचा प्रयत्न आणि वरिष्ठ लिपिक संगीता मोरे यांनाही धमकावण्यात आल्याचा आरोप अडसूळ आणि त्यांच्या साथीदारांवर करण्यात आला आहे.

याप्रकरणी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी पुढील हस्तक्षेप केल्यामुळे भाऊसाहेब पठाण थोडक्यात बचावले. तसेच पोलिसांनाही लगेच पाचारण करण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं आहे.

बुधवारी सकाळी हा प्रकार समजल्यानंतर मंत्रालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गात खळबळ माजली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याप्रकरणी कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान, सदर घटनेचे आज नागपुरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. नागपूर येथे विधिमंडळावर मोर्चा नेण्याचा निर्णय संतप्त कर्मचारी वर्गाने घेतला आहे.

दी महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखालील एकता पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. त्याचा राग मनात ठेवून वचपा काढण्याच्या हेतूने आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचं म्हटलं जातंय.

या सोसायटीत आमची युनियन असून सभासदांची वर्गणी पतपेढीच्या मार्फत भरा तसेच दोघा कर्मचा-यांची संचालक मंडळावर नियुक्ती करा, अशी मागणी करत अडसूळ यांनी पतसंस्थेत येऊन वाद घालण्यास सुरूवात केली. या पतसंस्थेचे उपाध्यक्ष या नात्याने ते दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संस्थेत जात असतात.

भाऊसाहेब पठाण आणि त्यांचे साथीदार दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत असताना तिथे येऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यावेळी युनियनची वर्गणी पतसंस्थेने भरणे नियमाबाह्य आहे ते करता येणार नाही. तसेच दोघा कर्मचा-यांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्याबाबत आगामी बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगूनही हल्ला करण्याचा उद्देश्य असल्यामुळे आनंदराव अडसूळ यांनी काचेची बाटली भाऊसाहेब पठाण यांच्या अंगावर फेकून मारल्याचे आरोपांत म्हटले आहे.

त्यामुळे त्यांना जबरदस्त मार लागला. तसेच त्यांच्या एका सहका-याने श्री. पठाण यांच्यासमवेत असलेल्या प्रमोद चव्हाण यांचा गळा दाबला. या जीवघेण्या हल्ल्यामुळे सर्वजण हादरून गेले. त्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केले आणि पोलिसांनी वेळीच पुढील अनर्थ टाळला, असे तक्रारीत म्हटले आहे.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...