मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंचा संवाद, राज्यपालांची नजर खाली! नेमकी काय चर्चा?

| Updated on: Feb 06, 2022 | 8:46 PM

Narendra Modi talks with Aditya Thackeray : राज्यपालांच्या शेजारी उभे असलेल्या राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे हे देखील मोदींना रिसीव्ह करण्यासाठी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनीही हात जोडून मोदींचं स्वागत केलं.

मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंचा संवाद, राज्यपालांची नजर खाली! नेमकी काय चर्चा?
नरेंद्र मोदी आणि आदित्य ठाकरे यांचा मुंबई विमानतळावरील फोटोनं राजकीय कुजबूज (Photo - ANI)
Follow us on

मुंबई : लता मंगेशकर यांच्या निधननानं (Lata Mangeshkar Death) संपूर्ण देशच नव्हे जगभरातील त्याचे चाहते हादरले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लता मंगेशकर यांच्या जाण्यानं मोठा धक्का बसला. सकाळीच त्यांनी लता मंगेशकरांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. इतकंच काय तर यानंतर काही वेळानं ते मुंबई लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी येणार आहेत, असंही त्यांनी स्वतः आपल्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन स्पष्ट केलं. पंतप्रधान राज्यात येणार म्हटल्यावर नेहमीचा शिरस्ता सांभाळावा लागणार होताच. मोदींच्या आगमनावेळी खरंतर उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांनीही हजर राहणं अपेक्षित होतं. पण मोदी जेव्हा मुंबईत विमानतळावर दाखल झालं, तेव्हा त्यांच्या आगमनावेळी त्यांचं औपचारीत स्वागत करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्याही हजर होते. राजशिष्टाचार आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेही तेव्हा उपस्थित होते. तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही यावेळी मोदींनी रिसीव्ह करण्यासाठी हजर होते. याच वेळचा एक फोटोदेखील समोर आला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांचं औपचारीक स्वागत केल्यानंतर आदित्य ठाकरे (A chat between PM Narendra Modi & Aditya Thackeray) यांच्या सोबत मोदींनी चर्चा केली. काही काळ ते थांबले. आदित्य ठाकरेंशी बोलले. यावेळी नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय तर्कवितर्क लढवले गेले नसते, तरच नवल!

राज्यपालांना भेटले, पण आदित्य ठाकरेंसमोर थांबले…

मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर नरेंद्र मोदी यांचं हात जोडून सगळ्या आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केलं. त्यानंतर राज्यपालांच्या शेजारी उभे असलेल्या राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे हे देखील मोदींना रिसीव्ह करण्यासाठी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनीही हात जोडून मोदींचं स्वागत केलं. मोदींनीही हात जोडत नम्रतापूर्वक त्यांना प्रतिसाद दिला. पण मोदी इथेच थांबले नाही.

पाहा मोदींच्या मुंबईतील आगमनाननंतर समोर आलेले फोटो!

यानंतर मोदींनी आदित्य ठाकरेंसोबत काही वार्तालाप केला. त्यांना काही विचारणा केली. तेव्हा मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरे संवाद साधताना दिसले. याबाबतचा फोटो जो समोर आला आहे, त्यात मोदींचा प्रश्न आदित्य ठाकरे अत्यंत बारकाईनं ऐकताना दिसून आले आहेत. मागच्या बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही दिसलेत.

नजर कुणाची कुठे?

एकीकडे या फोटोमध्ये आदित्य ठाकरे यांची मोदींसोबत थेट नजरानजर करत बातचीत सुरु असल्याचं दिसतंय. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची नजर मात्र खाली असल्याचं फोटोमध्ये कैद झालंय. या वेळी मोदींनी नेमकी कोणत्या गोष्टींची चौकशी आदित्य ठाकरेंकडे केली असावी, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. राजशिष्टाचार मंत्री असल्याच्या नात्यानं आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी मोदींनी रिसीव्ह करण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते.

केंद्र आणि राज्याची धुसफूस

कोरोना लसीकरणाचा मुद्दा असेल, किंवा केंद्रीय यंत्रणा आणि राज्यातील यंत्रणा यांचा वापर असेल, वेगवेगळ्या मुद्द्यांवर केंद्र विरुद्ध राज्य असा टोकाचा संघर्ष महाविकास आघाडी सरकार आल्यापासून महाराष्ट्रानं अनुभवलेला आहे. राज्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी आदित्य ठाकरेंसोबत झालेली चर्चा याला या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरच विशेष महत्त्व प्राप्त होतं. लता मंगेशकर यांना आदरांजली वाहायला आलेल्या नरेंद्र मोदी यांनी मुंबई विमानतळावरुन नंतर शिवाजी पार्कमध्ये जाऊन लता मंगेशकरांनाही आदरांजली वाहिली. पण त्याआधी त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांची भेटही घेतली. या भेटीतील ‘बिटवीन द लाईन्स’ आणि त्यांचे अर्थ येत्या काळात काढले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या :

Lata Mangeshkar Funeral : पंतप्रधान मोदींनी शिवाजी पार्कवर वाहिली लतादीदींना श्रद्धांजली, दिग्गजांची उपस्थिती

Punjab Election 2022: ना सिद्धू, ना जाखड, चरणजीत सिंग चन्नीच काँग्रेसचा पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, राहुल गांधी यांची मोठी घोषणा

कट्टर राजकीय विरोधक एकत्र, अजित पवार-हर्षवर्धन पाटील यांच्यात काय चर्चा?