AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खोक्यांवरुन रामदास आठवलेंनी इतकी भारी कविता केलेय की रवी राणा आणि बच्चू कडू पण भांडण विसरतील आणि….

रवी राणा आणि बच्चू कडू वादावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी एक भन्नाट कविता केली आहे.

खोक्यांवरुन रामदास आठवलेंनी इतकी भारी कविता केलेय की रवी राणा आणि बच्चू कडू पण भांडण विसरतील आणि....
रामदास आठवलेImage Credit source: tv9
| Updated on: Oct 31, 2022 | 9:22 PM
Share

मुंबई : खोके घेतल्याच्या आरोपांवरुन आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद जवळपास मिटला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत दोन्ही आमदारांनी वाद मिटवला आहे. या वादावर आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी एक भन्नाट कविता केली आहे. या कवितेच्या माध्यामातून रामदास आठवलेंनी आमदार नवनीत राणांचे कान टोचले आहेत. जे म्हणतात घेतले आहेत खोके, त्यांचे फिरले आहेत डोके अशी कविता करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी आमदार नवनीत राणांवर निशाणा साधला आहे.

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकताना आठवलेंनी खास कवितेच्या माध्यमातून भाष्य केले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आरपीआय महिला आघाडीची राष्ट्रीय बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आठवलेंनी राहुल गांधींसह महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आगामी निवडणुकांवर काही परिणाम होणार नाही. उलट भाजपचे चारशे खासदार निवडून येतील आणि त्या केंद्रीय मंत्रिमंडळात ही मी मंत्री असेन असं ठाम मत आठवलेंनी व्यक्त केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महायुतीला अजिबात आवश्यकता नाही. ते चांगले वक्ते आहेत, त्यांनी मोठ्या सभा घेत राहाव्यात आणि आम्ही सत्तेत येत राहावं अशी मिश्किल टिप्पणी देखील आठवलेंनी केली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला मंत्रिपदाचा वाटा मिळावा, अशी आमची आग्रही मागणी असल्याचेही रामदास आठवले पुन्हा एकदा म्हणाले.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.