AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : टीम मायदेशात 14 सामने खेळणार, वेळापत्रक जाहीर,3 संघांविरुद्ध भिडणार, कुणाचं आव्हान?

Cricket : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मायदेशातील आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलिया मायदेशात एकूण 3 संघांविरुद्ध भिडणार आहे. जाणून घ्या ऑस्ट्रेलिया पुरुष आणि महिला क्रिकेट संघ कधी आणि कुणाविरुद्ध कोणत्या मालिकेत भिडणार.

Cricket : टीम मायदेशात 14 सामने खेळणार, वेळापत्रक जाहीर,3 संघांविरुद्ध भिडणार, कुणाचं आव्हान?
allan border fieldImage Credit source: @WBBL x account
| Updated on: Mar 23, 2026 | 2:25 PM
Share

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचं मायदेशातील 2026-2027 या मोसमासाठी सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार ऑस्ट्रेलिया घरात एकूण 3 संघांविरुद्ध एकूण 14 सामने खेळणार आहे. या 14 सामन्यांमध्ये कसोटी, वनडे आणि टी 20i सामन्यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया मायदेशात एकूण 3 संघांविरुद्ध भिडणर आहे. ऑस्ट्रेलिया कोणत्या संघाविरुद्ध किती सामने खेळणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने मायदेशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकांचं 22 मार्च रोजी वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार ऑस्ट्रेलिया मायदेशात बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.

टी 20i मालिका

ऑस्ट्रेलिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध वनडे आणि टी 20i मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये एकूण 8 सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची मायदेशात या वर्षी एकही मालिका नाही.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिका

ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच न्यूझीलंड विरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. डिसेंबर 2026 मध्ये हे सामने होणार आहेत. या मालिकिची सुरुवात 9 डिसेंबरपासून होणार आहे. तर मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना हा 4 ते 8 मार्च दरम्यान होणार आहे. न्यूझीलंड या निमित्ताने 1999 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात 3 किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. याआधी फक्त 3 कसोटी सामनेच खेळवण्यात येणार होते. मात्र इंग्लंड विरूद्धच्या विशेष कसोटी सामन्यानिमित्ताने अधिकची मॅच खेळवण्याचं निश्चित करण्यात आलं.

कांगारुंचे 2026 मध्ये एकूण 15 एकदिवसीय सामने

ऑस्ट्रेलियाला त्याआधी ऑगस्ट महिन्यात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने होणार आहेत. हे सामने ऑगस्टमध्ये नियोजित आहेत.

तसेच ऑस्ट्रेलियाला नोव्हेंबर महिन्यात इंग्लंड विरुद्ध 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाला 2026 या वर्षात एकूण 15 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाला पाकिस्तान, बांगलादेश, झिंबाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका खेळायची आहे.

ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमसमोर कुणाचं आव्हान?

तसेच ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमसमोर ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशचं आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 3 एकदिवसीय आणि 3 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. बांगलादेश वुमन्स टीम या दोन्ही मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा हा पहिलाच ऑस्ट्रेलिया दौरा असणार आहे.

त्यानंतर ऑस्ट्रेलिया वुमन्स क्रिकेट टीमला नववर्षात 2027 मध्ये फेब्रुवारी ते मार्च दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ