AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : पोलिसांकडून मोठी माहिती समोर, केतनच्या बहिणीचं सियाच्या भावासोबत ठरलेलं लग्न, गोयल कुटुंब काय लपवतंय?

Cross Marriage Angle In Ketan Murder : केतनच्या बहिणीचं सियाच्या भावासोबत ठरलेलं लग्न... बाली ट्रिपसाठी एकत्र गेलेले तेव्हा नेमकं काय झालेलं, गोयल कुटुंब काय लपवतंय? पोलीस चौकशीत मोठी माहिती अखेर समोर

Ketan Agarwal Murder Case : पोलिसांकडून मोठी माहिती समोर, केतनच्या बहिणीचं सियाच्या भावासोबत ठरलेलं लग्न, गोयल कुटुंब काय लपवतंय?
Ketan Agarwal Murder Case
| Updated on: Jul 01, 2026 | 8:23 AM
Share

Cross Marriage Angle In Ketan Murder : केतन हत्याकांड प्रकरणात तपास जसाजसा पुढे सरकत आहे, तसा गुंता देखील वाढत आहे. आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त केतन आणि सिया यांचंच लग्न होणार नव्हतं, तर सिया हिचा भाऊ साहिल याचं लग्न केतन याच्या बहिणीसोबत ठरवण्यात आलं होतं. याच कारणामुळे सिया आणि केतन यांच्यासोबत साहिल आणि केतन याची बहीण देखील जाणार होती. ज्यामुळे त्यांच्यामधील नातं आखणी चांगलं झालं असतं. मिळालेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया यांचं लग्न नोव्हेंबर मध्ये होणार होतं आणि त्यानंतर साहिल आणि केतन यांचं लग्न होणार होतं.

साहिल गोयल याच्या याच भूमिकेवर आता पोलिसांची टांगती तलवार आहे. पोलीस याच गोष्टीचा कसून शोध घेत आहे की, साहिल याला सिया आणि चेतन चौधरी यांच्या अफेअरबद्दल माहिती होती. पण त्याने दोन्ही कुटुंबियांपासून एवढी मोठी गोष्ट का लपवली? दरम्यान, साहिल याने एका मुलाखतीत हैराण करणारे दावे केले आहेत.

साहिल म्हणालेला, ‘सिया हिने मला शपथ दिलेली की, केतन याच्यासोबत तिचे आता काहीच संबंध नाही. मला पूर्ण विश्वास होता की, ते दोघे आता फक्त मित्र आहे. त्यासाठी मी माझ्या आई – वडिलांना देखील याबद्दल काहीही सांगितलं नाही. केतन याच्यासोबत लग्न ठरलं म्हणून सिया आनंदी होती. व्हिडीओ कॉलवर दोघे बोलत असायचे. एवढंच नाही तर, प्री – वेडिंग फोटोशूटसाठी ती नवीन जागा देखील शोधत होती…’, असं साहिल यांने सांगितलं, पण पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल याला चेतन आणि सिया यांच्या नात्याबद्दल सर्वकाही माहिती होतं.

ड्रायव्हरने सांगितलेलं सत्य देखील धक्कादायक

प्री-वेडिंग शूटच्या दिवशी सियाला विमानतळावर सोडणाऱ्या ड्रायव्हरने पोलिसांकडे एक धक्कादायक जबाब नोंदवला आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, जेव्हा सियाने बालीला जाण्यास नकार दिला, तेव्हा साहिलने तिला बळजबरीने गाडीत बसवलं. शिवाय, बालीला जाण्याच्या प्रवासापूर्वी केतनचा पासपोर्ट फाडण्याच्या घटनेबाबत साहिलनं मौन बाळगल्यामुळे पोलिसांच्या मनात तीव्र संशय निर्माण झाला आहे.

साहिल गोयल याची 10 तास चौकशी

सोमवारी पोलिसांनी साहिल गोयल याची 10 तास चौकशी केली. सांगायचं झालं तर, जरी साहिलला या प्रकरणात अद्याप अधिकृतपणे आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेलं नाही, तरीही तो या खुनाच्या कटात सहभागी होता की सर्व काही माहीत असूनही गप्प राहिला, हे निश्चित करण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. तर सिया आणि चेतन यांनी त्यांचा गुन्हा मान्य केला आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...