AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder : भयानक माहिती समोर… आधी निसटला, परत आला… केतनच्या हत्येनंतर चेतनने असं काय केलं?

केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. 18 जून रोजी लोहगडावरून पडून केतनचा मृत्यू अपघात वाटला होता, पण त्याची होणारी पत्नी सिया आणि मित्र चेतनने कट रचून त्याला मारल्याचे समोर आलं. आता पोलिसांनी आरोपी चेतनला लोहगडावर सीन रिक्रिएशनसाठी आणले आहे. यातून हत्येबद्दलच्या अनेक गुढ प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.

Ketan Agarwal Murder : भयानक माहिती समोर... आधी निसटला, परत आला... केतनच्या हत्येनंतर चेतनने असं काय केलं?
सीन रिक्रिएशनसाठी आरोपी चेतन चौधरी लोहगडावर
| Updated on: Jul 01, 2026 | 10:00 AM
Share

केतन अग्रवाल हत्याप्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकत असून रोज नवनव माहिती समोर येत आहे. 18 जून रोजी लोगहजावरून पडून केतनाच मृत्यू झाला. तो अपघात असल्याचे सगळेच समजत होते. मात्र केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा मित्र चेतन यांनी दोघांनी कट रचून केतनला मारल्याचं पुढे आलं. यानंतर पोलिसांनी सिया व चेतनला अटक केली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. 29 जूनला त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता, न्यायालयाने त्यांन 3 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी ठोठावली.

आता याच प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीला रिक्रिएशन करण्यासाठी पोलिसांकडून लोहगडावरती आणण्यात आलं आहे. यापूर्वी, रविवारी 28 जून रोजी सिया गोयल हिला लोहगडावर सीन- रिक्रिएशनसाठी आणण्यात आलं होतं. आता त्याच ठिकाणी आरोपी चेतन चौधरी याला पोलीस बंदोबस्तामध्ये लोणावळा पोलिसांकडून लोहगडावरती आणण्यात आलं आहे.

लोहगडावर होणार क्राईम सीन रिक्रिएशन

लोणावळा ग्रामीण पोलीस केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला आज लोहगडावर क्राईम सीन रिक्रिएशन साठी घेऊन गेले आहेत. केतनची ज्या दिवशी हत्या झाली, त्या हत्या वेळी आरोपी चेतन याने जे कपडे परिधान केले होते, त्याच कपड्यावर त्याचं गेट अनालिसिस करण्यात येणार आहे. तसेच क्राईम सीन रिक्रेशन लोणावळा पोलिस करणार आहेत,त्यासाठी आरोपी चेतन ला पोलीस लोहगडावर घेऊन गेले असून आता यातून काय नवी माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पोलीस करणार गेट ॲनॅलिसिस

दरम्यान पोलिसांकडून चेतनचं गेट ॲनॅलिसिस देखीलही करण्यात येणार आहे. एआयच्या माध्यमातून केतन चौधरीचा वॉकिंग पॅटर्न तपासण्यात येणार आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चालण्याची पद्धत आणि विशेषतः या उद्देशासाठी रेकॉर्ड केलेला चेतनच्या चालण्याचा व्हिडिओ यांची तुलना केली जाईल. ‘” आम्ही चेतनच्या चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण (gait analysis) करण्याची योजना आखत आहोत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो हुडीने चेहरा झाकून चालताना दिसतोयहे. दोन्ही फुटेजमधील चालण्याच्या पद्धती जुळतात का हे तपासण्यासाठी, त्याच्या चालण्याची तुलना नव्याने रेकॉर्ड केल्या जाणाऱ्या व्हिडिओशी केली जाईल.” असं एका पोलीस अधिकाऱ्याने न्यायालयासमोर सांगितलं होतं.

Follow Us
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...