AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal Murder Case : हुडीमुळे चेहरा लपला, पण चेतनला चाल अडकवणार? केतन हत्या प्रकरणात पोलिसांचं नवं अस्त्र

पुण्यातील केतन अग्रवाल याच्या चर्चित हत्या प्रकरणाचा तपास आता अत्याधुनिक फॉरेन्सिक तंत्रज्ञानापर्यंत पोहोचला आहे. या तपासादरम्यान कट-कारस्थान, नष्ट केलेले डिजिटल पुरावे, हरवलेला पासपोर्ट आणि गुन्ह्याच्या ठिकाणाचे पुनर्निर्माण (रिकन्स्ट्रक्शन) यांसारखे अनेक नवीन पैलू समोर आले आहेत. आता पोलीसांकडून आरोपी चेतन चौधरीचे 'गेट ॲनालिसिस' केलं जाणार आहे.

Ketan Agarwal Murder Case  : हुडीमुळे चेहरा लपला, पण चेतनला चाल अडकवणार? केतन हत्या प्रकरणात पोलिसांचं नवं अस्त्र
केतनअग्रवाल हत्याप्रकरणात पोलिसांचे नवे अस्त्र
| Updated on: Jun 30, 2026 | 11:10 AM
Share

लोहगडावरून खोल दरीत पडून मृत्यू झालेला केतन अग्रवाल याची केस सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. याप्रकरणी पोलिसांनी केतन याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी या दोघांना अटक केली असून काल त्यांची पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात आता एक मोठं वळण आलं आहे. केतन अग्रवाल हत्याकांडात पोलिस आता आरोपी चेतन चौधरी याचं ‘गेट ॲनालिसिस’ ( (चालण्याच्या पद्धतीची न्यायवैद्यक तपासणी) करण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच एआयच्या माध्यमातून केतन चौधरीचा वॉकिंग पॅटर्न तपासण्यात येणार आहे. लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची चालण्याची पद्धत आणि विशेषतः या उद्देशासाठी रेकॉर्ड केलेला चेतनच्या चालण्याचा व्हिडिओ यांची तुलना केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली.

जेव्हा एखादा आरोपी आपला चेहरा लपवण्यासाठी हुडी, मास्क किंवा हेल्मेटचा वापर करतो, तेव्हा साधारणपणे या तंत्राचा वापर केला जातो; पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येच्या दिवशी लोहगडावर जाताना चेतन चौधरी याने हुडी घातली होती.

सुनावणीनंतर, न्यायालयाने आरोपी चेतन चौधरी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवली. तपासाचे अनेक पैलू अद्याप तपासायचे बाकी आहेत, असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं; यामध्ये किल्ल्यावरील हत्येचे नेमकं ठिकाण, डिलीट केलेला डिजिटल पुरावा हस्तगत करणे आणि मृत केतन याचा हरवलेला पासपोर्ट शोधून काढणे यांचा समावेश आहे. 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून 25 वर्षीय केतन अग्रवालला शेकडो फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केल्याचा आरोप सिया गोयल (वय 20) आणि चेतन चौधरी (वय 22) यांच्यावर आहे.

पोलीस करणार गेट ॲनालिसिस

आता पोलीस चेतनला तशाच प्रकारची ‘हुडी’ (hoodie) घालून त्याच परिसरातून चालण्यास सांगण्याची तयारी करत आहेत. जेणेकरून लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या व्यक्तीची चालण्याची पद्धत आणि चेतन याचं चालणं याची चुलना करता येऊ शकेल. ‘” आम्ही चेतनच्या चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण (gait analysis) करण्याची योजना आखत आहोत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो हुडीने चेहरा झाकून चालताना दिसत आहे. दोन्ही फुटेजमधील चालण्याच्या पद्धती जुळतात का हे तपासण्यासाठी, त्याच्या चालण्याची तुलना नव्याने रेकॉर्ड केल्या जाणाऱ्या व्हिडिओशी केली जाईल.” असं एका पोलीस अधिकाऱ्याने न्यायालयात सांगितलं.

धक्का दिला त्या जागीची चेतन-सियाने केली होती रेकी

दरम्यान 29 जूनपर्यंत असलेली पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींना वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. केतनला ज्या विशिष्ट ठिकाणावरून खाली ढकलले जाऊ शकत होते, त्याची पाहणी करण्यासाठी आरोपींनी यापूर्वी त्या किल्ल्याला भेट दिली होती असं तपासादरम्यान निष्पन्न झाल्याचं सरकारी वकील राजश्री विरकुड यांनी न्यायालयाला सांगितलं. आणि याच मुद्द्याबाबत त्यांची कसून चौकशी करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवणे आवश्यक असल्याचंही वकिलांनी न्यायालयासमोर नमूद केलं. तसंच, कट रचण्यासाठी आरोपी विविध ठिकाणी भेटले होते आणि या भेटीगाठींबाबत सविस्तर तपास करणे गरजेचे असल्याचेही सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सांगितलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन या आरोपींनी डिजिटल डेटाही नष्ट केला होता आणि तो पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. हा डेटा हस्तगत झाल्यानंतर, त्या आधारे त्यांची सखोल चौकशी केली जाईल. सियाने दिलेल्या जबाबाच्या आधारे 28 जून रोजी लोहगडावर जाऊन सीन रिक्रिएशन करण्यात आलं होतं, आता चेतनने दिलेल्या माहितीशी पडताळणी करून याची खात्री केली जाईल. केतनची हत्या झाली, त्या घटनेच्या दिवशी, त्यावेळी दोन्ही आरोपींनी लोहागड किल्ल्यावर काही व्यक्तींशी संवाद साधला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सर्व बाबींचा तपास केला जात आहे. तसेच, प्री-वेडिंग फोटोशूटसाठी केतनसोबत बालीला जाण्याची सियाची इच्छा नव्हती, हे देखील तपासातून समोर आलं आहे.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...