AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉमेडीचं टीव्हीवर सोडू, राजकिय सामाजिक काम करत राहू; अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबईचे (Mumbai) पालकमंत्री आदित्य ठाकरे जोगेश्वरी पूर्व इथल्या पुनम नगर महापालिका शाळेच्या बास्केटबॉल कोर्ट चे उद्घाटन करण्यात आलं. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावेळी विविध मुद्यावर भाष्य केलं.

कॉमेडीचं टीव्हीवर सोडू, राजकिय सामाजिक काम करत राहू; अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
Aaditya Thackeray
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 2:59 PM
Share

मुंबई : मुंबईचे (Mumbai) पालकमंत्री आदित्य ठाकरे जोगेश्वरी पूर्व इथल्या पुनम नगर महापालिका शाळेच्या बास्केटबॉल कोर्ट चे उद्घाटन करण्यात आलं. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी यावेळी विविध मुद्यावर भाष्य केलं. मी शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडत आहे. मुंबईचं मॉडेल आणि महाराष्ट्राचं मॉडेल इतर राज्यात पोहोचवणार आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी कॉमेडीला टीव्हीवर राहूदेत, आपण राजकिय काम आणि उदीष्टाला महत्त्व द्यायचं, असं ते म्हणाले. हा एकप्रकारे आदित्य ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री आपले पहिल्या पाच मध्ये आलेले आहेत. मविआच्या कामाचं माँडेल इतर राज्यात पोहोचवणार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

अमृता फडणवीस यांनी भाजपचे 105 आमदार कामं करतात. तुमचे लोक घरी बसतात, अशी टीका केली होती. ट्राफिक मुळं घटस्फोट होतात या विषयी यासंदर्भात विचारलं असता, कामेडीला टीव्हीवर राहुदेत आपण राजकीय काम आणि उद्दिष्टाला महत्व द्यायचं.अमृता फडणवीसांवर बोलताना आदित्य ठाकरेंनी हे उत्तर दिलं आहे.

निवडणूक सुरु झाल्यावर बोलू

निवडणूक सुरु होतील तेव्हा आपण त्यावर बोलू आमचे प्रयत्न निवडणुकीसाठी हे नाही तर विकासकामांसाठी आहे, अस आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसैनिकांना कुठल्या बास्केटमध्ये कुठला बॉल टाकायचा हे माहिती आहे. निवडणुकीला अद्याप वेळ आहे. चांगली काम होत असतात ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. निवडणुकीच्या वेळेला विरोधकांना प्रचारात उत्तर देऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले

शिवसैनिक म्हणून कर्तव्य पार पाडतोय

शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य पार पाडत आहे. इतर राज्यात जिथे आम्ही लढत आहोत, तिथे प्रचाराला जात आहोत. इतर राज्यातही शिवसेनेची मागणी आहे.मुंबईचं मॉडेल काय? महाराष्ट्राचं मॉडेल काय आहे, हे गेली दोन्ही वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टॉप फाईव्ह मधले मुख्यमंत्री बनून दाखवलं आहे. देशभरात मुख्यमंत्र्यांची स्पर्धा असते हा नंबर मिळविण्यात कठीण काम असतं. हे महाराष्ट्राचं गव्हर्नन्स मॉडेल आम्ही देशासमोर मांडणार आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या:

Udayanraje Bhosale: अजित पवारांना भेटले उदयनराजे, मग राष्ट्रवादीत जाणार का? राजे म्हणतात, सर्व पक्षीय समभाव!

VIDEO: उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 60 अन् लोकसभेच्या 20 जागाही लढवणार; शिवसेना यूपीत भाजपचा खानाखराब करणार?

Aaditya Thackeray answer to statement of Amruta Fadnavis over MVA Government

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.