अब्दुल सत्तार विखे पाटलांच्या भेटीला, एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात!

शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांची भेट घेतली.

अब्दुल सत्तार विखे पाटलांच्या भेटीला, एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात!

अहमदनगर :  शिवसेना नेते तथा राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांची भेट घेतली. विखेंच्या निवासस्थानी जाऊन सत्तार यांनी भेट घेतल्याने नगर जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. (Abdul Sattar Meet Radhakrushna Vikhe patil)

राज्यात शिवसेना भाजप जोरदार संघर्ष सुरु असताना तसंच पदवीधर निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असताना सत्तार यांनी विखेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. पडद्यामागच्या काही राजकीय गणितांवर विखे-सत्तार यांच्यात चर्चा झाली का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे अब्दुल सत्तार यांच्या हस्ते भुमिपूजन पार पडलं. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित होते.

राधाकृष्ण विखेंच्या लोणी येथील निवासस्थानी जाऊन सत्तार यांनी विखेंबरोबर स्नेहभोजन केलं. भोजनानंतर विखे-सत्तारांमध्ये गप्पांची मैफल रंगली. दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

भेटीनंतर एका लग्नाला दोघांनीही एकत्र हजेरी लावली. यावेळी त्यांच्यात बऱ्याचवेळ चर्चा झालेली पाहायला मिळाली. विखे-सत्तार दोघेही वर्षभरापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यात खास मैत्री होती. मात्र दरम्यानच्या काळात काही गणिते बदलली आणि सत्तारांनी सेनेचा भगवा हाती धरला तर विखेंनी भाजपचं कमळाचं उपरणं आपल्या गळ्यात बांधलं. दोघांच्या राजकीय वाटा जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी आज सत्तारांनी विखेंची भेट घेऊन मैत्री शाबूत ठेवली आहे.

(Abdul Sattar Meet Radhakrushna Vikhe patil)

हे ही वाचा

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद, विषय अद्याप गुलदस्त्यात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *