AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खैरैंचे एकाहून एक आरोप, सत्तारांचं प्रत्येक मुद्द्याला जशास तसं उत्तर, मायनस झिरोचीही उपमा! पाहा…

खैरैंच्या आरोपाला सत्तारांचं प्रत्युत्तर, पाहा काय म्हणालेत...

खैरैंचे एकाहून एक आरोप, सत्तारांचं प्रत्येक मुद्द्याला जशास तसं उत्तर, मायनस झिरोचीही उपमा! पाहा...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 29, 2022 | 10:37 AM
Share

औरंगाबाद : चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. हे दोन नेते एकमेकांवर सडकून टीका करत असतात. आताही चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. तर सत्तार यांनीही त्याला जशास तसं उत्तर दिलं आहे. व्हायरल व्हीडिओ, जमिनी हडपण्याचा विषय, गाडण्याची भाषा झिरो दर्जाचा नेता, यासह अन्य मुद्दे या दोघांच्या भांडणात चर्चेत आलेत.

शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. अशा कृषीमंत्री सत्तार जिल्हाधिकाऱ्यांशी अरेरावीची भाषा वापरतात. दारू पिण्याची भाषा वापरणं योग्य नाही. अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी टीका केली.

खैरेंच्या टीकेला सत्तारांनी प्रत्युत्तर दिलंय. चंद्रकांत खैरे गंडलेला माणूस आहे. त्यांच्याकडं आमदार-खासदार कुठलंही पद नाही. ते काय मला गाडणार, त्यांना गाडण्याचं काम मीच करणार, असं सत्तार म्हणालेत.

सत्तार म्हणजे हिरवा साप आहे. देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे की, असे मंत्री असतील तर सरकारची प्रतिमा खराब होतेय. त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढावं. त्यांचा राजीनामा घ्या आणि त्यांना हाकलून द्या, असं खैरे म्हणाले.

खैरेंच्या टीकेला सत्तार यांनी उत्तर दिलंय. खैरेंनी काय बोलावं ते मी सांगू शकत नाही. पण खैरे म्हणजे बंद दुकान आहे. बंद दुकानाची चर्चा काय करणार? खैरे मायनस झिरो माणूस आहे. झिरो माणसाची काय चर्चा करायची? जनतेतून निवडणून आलेल्या आमदार-खासदारांच्या विधानाची चर्चा केली तर ठीक आहे. पण झिरो माणसाबद्दल काय बोलणार. मी हिरवा साप आहे की काळा ते लोकसभा निवडणुकीत दाखवून देईल, असं सत्तारांनी म्हटलंय.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर