Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेचं करिअर उद्ध्वस्त? वडिलांच्या दाव्याने खळबळ

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके सध्या चांगलाच चर्चेत आहे. आंदोलन संपल्यानंतर आज तो छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी पोहोचला आहे. त्यावेळी त्याच्या वडिलांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेचं करिअर उद्ध्वस्त? वडिलांच्या दाव्याने खळबळ
Abhijeet Dipke
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 4:14 PM

दिल्लीत जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले. या आंदोलनात लाखोंच्या संख्येने आंदोलक विद्यार्थी सहभागी झाले. सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपकेच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन सुरु होते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे विद्यार्थांच्या आंदोलनाचे यश मानले जात आहे. आता अभिजीत दीपकेचे आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या घरी पोहोचला आहे. त्यावेळी त्याचे वडील भगवान दिपके यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी थेट अभिजीतने स्वत:चे करिअर उद्ध्वस्त केल्याचे म्हटले आहे.

अभिजीतचे वडील काय म्हणाले?

भगवान दीपके यांनी टीव्ही 9 मराठीशी खास संवाद साधला. त्यावेळी मुलाविषयी बोलताना ते म्हणाले की, त्यांने जे काम केले ते खूप मोठे केले आहे. राजसत्तेला टक्कर दिली आहे. हे सगळं करून तो सुखरूप घरी येतोय हे खूप महत्त्वाचा आहे. त्याला खूप चांगल्या ऑफर आल्या होत्या. त्याने स्वतःचे करिअर उध्वस्त केल्यासारखं आहे. अभिजीत अमेरिका सोडून आलाय. लोकांना साधा जॉब लागला तरी कोणी सोडत नाही. आता माझे सर्वांनाच आवाहन आहे की अभिजीतच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावं. त्याचं कर्तृत्व मोठं आहे.

“तो आता देशाचा भक्त झाला आहे”

पुढे ते म्हणाले, तो अमेरिकेतून शिकून आला आहे. मी माझ्या घरापुरतं बघत होतो. तो आता देशाचा भक्त झाला आहे. मला त्याचा अभिमान वाटतो. पण मुलगा म्हणून पहिले तर मला चिंता वाटायची. तो सुखरूप येतो की नाही याची मला भीती वाटायची ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण होतं. तो एक मिनिट आम्हाला कंटिन्यू कधीच बोलला नाही, जास्तीत जास्त 30 सेकंद खूप झालं.

अभिजीत दीपकेची आई अनिता दीपके यांनी आनंद व्यक्त केला आहे. आज तो घरी येत आहे तर खूप आनंद होत आहे. तो आमचा गुरु म्हणून घरी येत आहे. आज गुरु पौर्णिमा आहे. त्याच्या फोनची वाट पाहत रात्र रात्र जागायचो. मात्र, आता तो खूप घरी येत असल्यामुळे आनंद वाटत आहे असे अभिजीतची आई म्हणाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us