AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; मोठी अपडेट काय?

राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.

राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; मोठी अपडेट काय?
Dilip Walse Patil Sharad Pawar MeetingImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 4:38 PM
Share

राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. अशातच आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीत या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याबाबत माहिती समजू शकलेली नाही. मात्र गेल्या काही काळापासून शरद पवारांची राष्ट्रवादी अजित दादांच्या राष्ट्रवादीत विलीन होऊन NDA मध्ये सामील होणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

वळसे पाटील आणि शरद पवार यांची पुण्यात भेट

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून शरद पवार हे पुण्यातील निवासस्थानी आहेत. आज गुरूपौर्णिमा असल्याने अनेक कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. त्यानंतर आज दुपारी दिलीप वळसे पाटील हेही शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रिकरण आणि पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होणार अशी चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर भेटी गाठींना वेग आला आहे. याचाच एक भाग म्हणून दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांची भेट घेत असल्याचे समोर आले आहे.

काल तटकरेंनी घेतली होती PM मोदींची भेट

मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तटकरे यांनी या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात तटकरे यांनी ‘आज नवी दिल्ली येथे देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध विकासकामांच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली व त्यांचे मार्गदर्शन घेतले अशी माहिती दिली आहे. यावेळी तटकरे हे पंतप्रधान मोदींनी एक निवेदन देत असल्याचेही पहायला मिळत आहेत.

शरद पवारांनीही घेतली होती पंतप्रधान मोदींची भेट

यापूर्वी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर शरद पवार यांनी स्पष्ट केले होते की, त्यांनी आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांसोबत NEET प्रश्नपत्रिका लीक प्रकरण, विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेतकऱ्यांच्या समस्या, जलव्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

Follow Us
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...