भाजपचे बंडखोर माणिकराव कोकाटेंच्या मागे एसीबीचा ससेमिरा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नाशिक : भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी माणिकराव कोकाटे यांना एसीबीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने कोकाटेंची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने कोकाटेंची बंडखोरी केली आहे. बंडखोरी केल्याने चौकशीचा ससेमिरा भाजपने मागे लावला का, अशी […]

भाजपचे बंडखोर माणिकराव कोकाटेंच्या मागे एसीबीचा ससेमिरा
Follow us on

नाशिक : भाजपचे बंडखोर उमेदवार आणि माजी माणिकराव कोकाटे यांना एसीबीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याने कोकाटेंची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ऐन निवडणूक काळात नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने कोकाटेंची बंडखोरी केली आहे.

बंडखोरी केल्याने चौकशीचा ससेमिरा भाजपने मागे लावला का, अशी चर्चा आता नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

माणिकराव कोकाटे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.

माझ्यावर एसीबीच्या माध्यमातून दबाव टाकला, तरी मागे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी टीव्ही 9 मराठीला दिला.

नाशिकमध्ये राजकीय गणितं काय?

नाशिक लोकसभा निवडणुकीत यंदा समीर भुजबळ विरुद्ध हेमंत गोडसे असा थेट सामना बघायला मिळतो आहे. हेमंत गोडसे यांना तिकीट मिळाल्याने माणिकराव कोकाटे नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी केली.

नाशिक लोकसभा मतदार संघ हा सहा विधानसभा मतदार संघांनी तयार झालेला आहे. ग्रामीण आणि शहरी भागांचा समावेश असलेला हा मतदार संघ भौगोलिकदृष्ट्या अवघड असला तरी यंदा मात्र या मतदार संघात युती विरुद्ध आघाडी आणि त्याहीपेक्षा भुजबळ विरुद्ध गोडसे असा थेट सामना रंगणार आहे.

विद्यमान खासदार हेमंत गोडसे गेल्या निवडणुकीत थेट छगन भुजबळांना पराभूत करुन जायंट किलर ठरले होते. पाच वर्षात केलेले विकास कामं, दांडगा जनसंपर्क आणि भाजप युतीचं बुथपातळीवरचं नियोजन या भरवशावर गोडसे पुन्हा खासदार होण्यासाठी कंबर कसत आहेत. मात्र या सगळ्यात त्यांच्या मनात असलेली एकच भिती म्हणजे नाशिकचा खासदारकीचा इतिहास. 1952 पासून 2014 पर्यंत नाशिक लोकसभा मतदार संघात 1972 चा अपवाद वगळला तर एकदा निवडणून आलेला खासदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही.

गोडसे यांच्याकडे नाशिक जिल्ह्यात आणलेले मोठे प्रोजेक्ट आणि विमानसेवेला लावलेला मुहूर्त हे भक्कम स्थान आहेत, तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या बंडखोरीमुळे त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे समीर भुजबळ यांच्याकडे देखील मागच्या खासदारकीचा दांडगा अनुभव आणि स्वत: छगन भुजबळ यांची पाठीशी ताकद उभी आहे. मात्र मधल्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानं भुजबळांना सगळी ताकद पणाला लावावी लागणार ही देखील वस्तुस्थिती आहे.