Eknath Shinde : ठाकरे सरकारसाठी पुढचे 24 तास वैऱ्याचे, शरद पवार दिल्ली सोडून मुंबईकडे, रात्री बैठकांचा सपाटा?

सुरतच्या हॉटेलमध्ये असलेले शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आता शिंदे साहेब घेतील तो आमचा निर्णय, असे बोरनारे आपल्या एका कार्यकर्त्याला सांगत आहेत. दिवसभरात राज्यात सुरु असलेल्या अशा राजकीय घडमोडींनी उद्धव ठाकरेंची चिंता वाढवली आहे. पुढच्या 24 तास शिवसेनेसाठी फार महत्वाचे असून, यावेळी काय राजकीय घमासान होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde : ठाकरे सरकारसाठी पुढचे 24 तास वैऱ्याचे, शरद पवार दिल्ली सोडून मुंबईकडे, रात्री बैठकांचा सपाटा?
ठाकरे सरकारसाठी पुढचे 24 तास वैऱ्याचे, शरद पवार दिल्ली सोडून मुंबईकडेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 7:15 PM

मुंबई : शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंची पुरती झोप उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठे धक्के सहन करावे लागू शकतात. एकनाथ शिंदेनी 30 ते 35 आमदारांच्या पाठिंब्यासह हे बंड (Revolt) पुकारले आहे. तसेच बंड मागे घेण्यासाठी शिंदे यांनी काही प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवले आहेत. राज्यातील राजकीय उलथापालथ पाहता शिवसेनेसाठी पुढील 24 तास ठाकरे सरकार (Thackeray Government)साठी वैऱ्याचे आहेत. त्यामुळे रात्री बैठकांवर बैठका होण्याची शक्यता असून या बैठकांमध्ये काय तोडगा निघतो याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावाबाबत शिवसेना काय निर्णय घेतेय? आणि शिंदे यांचे बंड थोपवण्यास यशस्वी होते का हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही दिल्लीहून मुंबईला रवाना झाले आहेत.

दरम्यान, सुरतच्या हॉटेलमध्ये असलेले शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आता शिंदे साहेब घेतील तो आमचा निर्णय, असे बोरनारे आपल्या एका कार्यकर्त्याला सांगत आहेत. दिवसभरात राज्यात सुरु असलेल्या अशा राजकीय घडमोडींनी उद्धव ठाकरेंची चिंता वाढवली आहे. पुढच्या 24 तास शिवसेनेसाठी फार महत्वाचे असून, यावेळी काय राजकीय घमासान होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत रात्री बैठकीचे आयोजन

महाराष्ट्र राज्य सरकारला कुठलाही धोका नाही. आज रात्री साडे आठ वाजता मुंबईत बैठक होणार आहे. शरद पवार बैठकीत जातील, त्यानंतर जे काही असेल ते स्पष्ट होईल, असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.