AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस सरकार संकटात, एका महत्त्वाच्या राज्यात महाराष्ट्रासारख घडू शकतं

उत्तरेकडच्या एका महत्त्वाच्या राज्यात काँग्रेस सरकार अल्पमतात दिसू लागलय. तिथे महाराष्ट्रासारख घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीय. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विधान परिषदेचे निकाल जाहीर झाल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलेलं. त्याचीच पुनरावृत्ती आता आणखी एका राज्यात होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस सरकार संकटात, एका महत्त्वाच्या राज्यात महाराष्ट्रासारख घडू शकतं
Congress Party
| Updated on: Feb 28, 2024 | 7:47 AM
Share

नवी दिल्ली : काल देशातल्या काही राज्यात राज्यसभा निवडणुका झाल्या. भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्याच पण प्रतिस्पर्धी पक्षाला धक्केही दिले. उदहारणार्थ उत्तर प्रदेशात राज्यसभेची दहावी जागा प्रतिष्ठेची बनली होती. ही जागा जिंकून भाजपाने समाजवादी पार्टीला धक्का दिला. सोबतच हिमाचल प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोठा उलटफेर केला. भाजपाने मंगळवारी राज्यसभेची एकमेव जागा जिंकली. महत्त्वाच म्हणजे क्रॉस वोटिंग झाल्यामुळे हिमाचल प्रदेशातील सुक्खू सरकार अल्पमतात दिसू लागलय. विरोधी पक्षात असलेल्या जयराम ठाकूर यांच्यासह भाजपा आमदार आज सकाळी राज्यपालांना भेटणार आहेत.

राज्यसभा निवडणुकीत भाजपा उमदेवादर हर्ष महाजन यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अभिषेक मनु सिंघवी यांना हरवलं. काँग्रेससाठी हा मोठा झटका आहे. 68 पैकी 40 आमदार काँग्रेसचे आहेत. यात 6 आमदारांनी क्रॉस वोटिंग केली. भाजपाकडे 25 आमदार आणि तीन अपक्ष आमदार आहेत. सुक्खू सरकार संकटात आहे. हा पेच सोडवण्याची जबाबदारी काँग्रेस हायकमांडने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार आणि भूपेंद्र हुड्डा यांच्यावर सोपवली आहे. दोन्ही नेते आज सिमल्यामध्ये दाखल होतील.

कुठल्या गेस्ट हाऊसबाहेर दिसले आमदार?

राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा सुक्खू सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार, ही चर्चा सुरु झालीय. राज्यसभा निवडणुकीसाठी एका आमदाराला सिमल्याला आणण्यासाठी काँग्रेसने हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था केली होती. जेणेकरुन त्याला मतदान करता येईल. एका व्हायरल व्हिडिओनुसार हिमाचल प्रदेशच्या काही आमदारांना भाजपाशासित हरियाणातील पंचकुला येथील सरकारी गेस्ट हाऊस बाहेर पाहण्यात आलं.

क्रॉस वोटिंग करणाऱ्यांनी सकाळी सोबत नाश्ता केलेला

“क्रॉस वोटिंग करणाऱ्या 9 आमदारांनी सोमवारी रात्री आमच्यासोबत भोजन केलं होतं. त्यातल्या तिघांनी सकाळी नाश्ता सुद्धा सोबत केला होता. पण त्यांनी आमच्याविरोधात मतदान केलं” असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागा आहेत. काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 40 आहे, भाजपाच 25. विधानसभेत बहुमताचा आकडा 35 आहे. क्रॉस वोटिंग करणारे काँग्रेसचे 6 आमदार आणि 3 अपक्ष असं मिळून भाजपाच संख्याबळ 34 होतं. आज हिमाचल प्रदेशमध्ये महाराष्ट्रासारख घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.